श्रद्धासोबत शक्तीही जीममध्ये
By Admin | Updated: November 11, 2014 00:07 IST2014-11-11T00:07:39+5:302014-11-11T00:07:39+5:30
अभिनेता शक्ती कपूर हा सध्या त्याची मुलगी श्रद्धासोबत जीममध्ये घाम गाळताना दिसत आहे. शक्ती कपूरने नुकताच एक चित्रपट साईन केला होता.

श्रद्धासोबत शक्तीही जीममध्ये
अभिनेता शक्ती कपूर हा सध्या त्याची मुलगी श्रद्धासोबत जीममध्ये घाम गाळताना दिसत आहे. शक्ती कपूरने नुकताच एक चित्रपट साईन केला होता. त्यासाठी आठ किलो वजन घटविण्याची अट दिग्दर्शकाने घातली होती. शक्तीने हे आव्हान तर स्वीकारले; मात्र एवढे वजन घटविणो कठीण असल्याचे त्याच्या लक्षात आले. या कामात श्रद्धाने तिच्या वडिलांना मदत केली. शक्ती कपूरला सोबत घेऊन ती दररोज जीममध्ये जात आहे. एखाद्या भूमिकेसाठी एवढा घाम गाळण्याची शक्ती कपूरची ही पहिलीच वेळ आहे. वजन घटविण्यासाठी शक्तीने जेवण तर कमी केलेच आहे; परंतु मद्यपानालाही ‘ब्रेक’ लावला असल्याची चर्चा रंगली आहे.