दादा कोंडके यांच्यावरचा चित्रपट पुढे ढकलला

By Admin | Updated: October 16, 2015 02:14 IST2015-10-16T02:14:15+5:302015-10-16T02:14:15+5:30

संवादाची फेक... गावरान निरागस लूक.. द्विअर्थी विनोदामधून निखळ मनोरंजन... हे विनोदसम्राट कै. दादा कोंडके यांच्या अभिनय आणि चित्रपटांचे वैशिष्ट्य.

Postponed the film on Dada Kondke | दादा कोंडके यांच्यावरचा चित्रपट पुढे ढकलला

दादा कोंडके यांच्यावरचा चित्रपट पुढे ढकलला

संवादाची फेक... गावरान निरागस लूक.. द्विअर्थी विनोदामधून निखळ मनोरंजन... हे विनोदसम्राट कै. दादा कोंडके यांच्या अभिनय आणि चित्रपटांचे वैशिष्ट्य. दादांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यावर चित्रपट काढण्याची घोषणा दिग्दर्शक संजय जाधव यांनी केल्याने दादांच्या चाहत्यांच्या आनंदाला उधाण आले होते. यासाठी ‘दादा’ हे शीर्षक देखील रजिस्टर करण्यात आले. अगदी या भूमिकेसाठी स्वप्नील जोशी की गोविंदा यांना घ्यायचे यावर देखील चर्चा झाली होती. उर्मिला कानेटकरचे नाव ‘उषा चव्हाण’ यांच्या भूमिकेसाठी अंतिम झाले होते, पण मिळालेल्या माहितीनुसार दादांवरचा चित्रपट काहीसा पुढे ढकलण्यात आलेला आहे.
स्वप्नील जोशी, स्वप्नील वाघमारे
यांच्या दोन चित्रपटांमध्ये व्यस्त आहे, तर संजय जाधवदेखील दुसऱ्या एका मराठी चित्रपटावर काम करीत आहेत. खूप वर्षांनंतर दादांच्या जीवनावर चित्रपट येणार असल्याने, दादांच्या प्रतिमेला न्याय देण्याचे खूप मोठे आव्हान दिग्दर्शकासमोर असणार आहे. त्यामुळे तो घाईघाईत उरकला जाऊ नये, या भूमिकेमधून तो चित्रपट पुढे ढकलण्यात आल्याचे समजते.

Web Title: Postponed the film on Dada Kondke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.