आदितीला करायचेत पॉझिटिव्ह रोल्स

By Admin | Updated: February 19, 2016 01:55 IST2016-02-19T01:55:24+5:302016-02-19T01:55:24+5:30

लय भारी चित्रपटातील नंदिनी आठवतेय का तुम्हाला.... नंदिनीचा तो ग्लॅमरस रोल पडद्यावर साकारला होता, अभिनेत्री आदिती पोहणकर हिने

Positive Rolls to Aditya | आदितीला करायचेत पॉझिटिव्ह रोल्स

आदितीला करायचेत पॉझिटिव्ह रोल्स

लय भारी चित्रपटातील नंदिनी आठवतेय का तुम्हाला.... नंदिनीचा तो ग्लॅमरस रोल पडद्यावर साकारला होता, अभिनेत्री आदिती पोहणकर हिने. लय भारी चित्रपटातून आदितीने करिअरची सुरुवात केली आणि तिच्या त्या पहिल्याच ‘डेब्यु’ चित्रपटाची सगळीकडे चांगलीच चर्चा झाली. रितेश देशमुखबरोबर तिला करिअरच्या फर्स्ट सिनेमामध्ये स्क्रीन शेअर करायला मिळÞाली, परंतु ‘लय भारी’ नंतर आदितीचे दर्शन काही कुठे झाले नाही. एक ते दिड वर्ष आदिती पोहणकर इंडस्ट्रीतून गायबच होती. आदितीच्या पायाला दुखापत झाल्याने ती आराम करीत असल्याची माहिती मिळत आहे, परंतु आता ती पूर्णपणे बरी झाली असून, लवकरच आपल्याला मोठ्या पडद्यावर तिचा अभिनय पाहायला मिळू शकतो. ‘लय भारी’ चित्रपटात ग्लॅमरस रोल केल्यानंतर आदितीला आता पॉझिटिव्ह रोल्स करण्याची इच्छा असल्याचे ती स्वत:च सांगत आहे. त्यामुळे तिला फ्युचर मध्ये चांगले पॉझिटिव्ह रोल्स मिळतील आणि तिचा अभिनय लवकरच तिच्या फॅन्सला पाहायला मिळेल, अशी आपण प्रतीक्षा करू या.

Web Title: Positive Rolls to Aditya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.