उपासना सिंगची मराठी ‘फॅमिली ४२०’

By Admin | Updated: December 18, 2015 01:30 IST2015-12-18T01:30:00+5:302015-12-18T01:30:00+5:30

स्टँड अप कॉमेडियन उपासना सिंगच्या अनेक भूमिका आजवर गाजल्या आहेत. बेदर्दी, लोफर, जुदाई, सरफरोश, ऐतराज, तलाश, इश्क विश्क, इडियट बॉक्स अशा अनेक चित्रपटांतील

Pooja Singh's Marathi 'Family 420' | उपासना सिंगची मराठी ‘फॅमिली ४२०’

उपासना सिंगची मराठी ‘फॅमिली ४२०’

स्टँड अप कॉमेडियन उपासना सिंगच्या अनेक भूमिका आजवर गाजल्या आहेत. बेदर्दी, लोफर, जुदाई, सरफरोश, ऐतराज, तलाश, इश्क विश्क, इडियट बॉक्स अशा अनेक चित्रपटांतील उपासना सिंग यांनी साकारलेला अभिनय कधीही न विसरता येण्यासारखा आहे. तर सध्या कॉमेडी नाइट्स विथ कपिलमध्ये त्या साकारत असलेल्या कपिलची बुवा नेहमीच धमाल उडवून देते. कित्येकदा तर त्यांनी चित्रपटात मराठी मोलकरणीची भूमिका साकारतानाही आपण पाहिले आहे. पण आता ही बुवा म्हणजेच उपासना सिंग चक्क ‘फॅमिली ४२०’ या चित्रपटातून मराठीत पदार्पण करत आहेत.
त्यांच्या या पदार्पणाबद्दल उपासना सिंग सांगतात, ‘मी मागील काही महिन्यांपासून मुंबईत राहत आहे आणि मनापासून माझी इच्छा होती, की मी मराठी चित्रपटात काम केले पाहिजे. पण मला उत्तम स्क्रिप्ट मिळत नव्हती आणि वेळ नसल्यामुळे हे शक्यही होते नव्हते. पण फॅमिली ४२०ची कथा ऐकल्यानंतर निर्माता देवराज आणि संतोष गायकवाड यांना नकार न देता मी लगेच होकार कळवला.’
या चित्रपटाचे दिग्दर्शन संतोष गायकवाड यांनी केले आहे, तर या चित्रपटात उपासना सिंग यांच्यासोबत विजय पाटकर, सुनील पाल, विजय कदम, सुकन्या कुलकर्णी आणि भूषण कडू यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या या सगळ्या भूमिकांप्रमाणेच आता मराठीतीलही भूमिका कायम लक्षात राहण्यासारखीच ठरेल हे काही वेगळे नको सांगायला.

Web Title: Pooja Singh's Marathi 'Family 420'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.