कोकणातल्या घरी पोहोचली पूजा सावंत, शेअर केले सुंदर फोटो…
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 17:40 IST2025-12-01T17:39:34+5:302025-12-01T17:40:36+5:30
पूजाचे कोकण प्रेम पुन्हा एकदा सोशल मीडिया पोस्ट्समधून पाहायला मिळाले आहे.

कोकणातल्या घरी पोहोचली पूजा सावंत, शेअर केले सुंदर फोटो…
Pooja Sawant In Konkan : आपल्या सुंदर अभिनयाने अभिनेत्री पूजा सावंत ही कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. पूजा सावंतला महाराष्ट्राची 'कलरफुल' अभिनेत्री म्हणूनही ओळखलं जातं. पूजा सावंत सध्या तिच्या कुटुंबासोबत कोकणातल्या घरी गेली आहे. वर्षातून काही दिवस ती आवर्जून कोकणातील तिच्या घरी घालवते.
पूजाचे कोकण प्रेम पुन्हा एकदा सोशल मीडिया पोस्ट्समधून पाहायला मिळाले आहे. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत तिने तिच्या चाहत्यांना कोकणातील निसर्गरम्य वातावरणाची झलक दाखवली. पूजा सावंतने 'कोकण डायरीज' असं कॅप्शन देत हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पूजा आणि तिच्या कुटुंबाने कोकणातल्या निसर्गरम्य वातावरणात एक छोटेसे घर बांधले आहे. जंगलाच्या आणि डोंगराच्या पायथ्याशी, शांत, निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या या घरात पूजा सुट्ट्यांचा मनसोक्त आनंद घेतेय.
पूजा सावंत ही कोकणातील घरी आली असली तरी तिचा पती हा ऑस्ट्रेलियात आहे. तो ऑस्ट्रेलियातील एका फायनान्स कंपनीत कामाला आहे. पूजादेखील त्याच्यासोबत ऑस्ट्रेलियात राहते. पण, सिनेमांच्या शुटिंगसाठी ती महाराष्ट्रात येत असते. पूजाच्या पतीच नाव सिद्धेश चव्हाण असं आहे. पूजानं सिद्धेश चव्हाण याच्यासोबत २८ फेब्रुवारी २०२४ रोजी अरेंज मॅरेज पद्धतीने लग्न केलं होतं.
पुजाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिनं आजवर अनेक चित्रपटांमधून तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तिने २०१० साली 'क्षणभर विश्रांती' या चित्रपटातून अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे, ज्यात 'झकास', 'सतरंगी रे', 'दगडी चाळ', 'लपाछपी' आणि 'नीलकंठ मास्तर' यांचा समावेश आहे. आता आगामी काळात अभिनेत्री कोणत्या नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, याबद्दल उत्सुकता कायम आहे.