पूजा भट्टने ‘यामुळे’ कायमची सोडली दारू!

By Admin | Updated: March 4, 2017 10:22 IST2017-03-04T02:27:55+5:302017-03-04T10:22:20+5:30

अभिनेत्री पूजा भट्ट ही मद्याच्या आहारी गेली होती.

Pooja Bhatting 'This' always left liquor! | पूजा भट्टने ‘यामुळे’ कायमची सोडली दारू!

पूजा भट्टने ‘यामुळे’ कायमची सोडली दारू!


अभिनेत्री पूजा भट्ट ही मद्याच्या आहारी गेली होती. पण गत ६९ दिवसांपासून पूजाने मद्याला स्पर्शदेखील केला नाही. गत २४ डिसेंबरला पूजाने मद्य सोडण्याचा निर्धार केला होता. यानंतर ख्रिसमस, न्यू इयर अशा कुठल्याही पार्टीत पूजाने मद्याचा एक थेंबदेखील घेतला नाही. इतकेच नाही तर गत २४ फेबु्रवारीला पूजाचा ४५वा वाढदिवस झाला. त्याची पार्टीदेखील मद्याविना रंगली. मद्यपान सोडण्याचा निर्णय पूजाने कसा घेतला आणि का घेतला, याविषयी अलीकडे ती मनमोकळेपणाने बोलली. २१ डिसेंबरला वडील महेश भट्ट यांचा पूजाला दिल्लीहून फोन आला. दोघांचेही बोलणे सुरु झाले. विषय होता, देशाची सद्यस्थिती, राजकारण, सत्तेसाठी सुुरू असलेली कटकारस्थाने. पूजा याबद्दल सांगते,‘आम्ही खूप वेळ बोललो. पापांनी फोन ठेवताना मला, ‘आय लव्ह यू बेटा’ म्हटले. मी सुद्धा ‘आय लव्ह यू पापा’ म्हणत, जगात तुमच्यापेक्षा माझ्यासाठी काहीही मोठे नाही, असे यांना म्हणाले. यावर पापा जे काही बोलले, ते ऐकून मी स्तब्ध झाले. ‘तू माझ्यावर प्रेम करत असशील तर मग स्वत:वर प्रेम करायला शिक़ कारण मी तुझ्याच हृदयात राहतो,’ असे पापा मला बोलून गेले. त्यांच्या त्या वाक्याने मी खडबडून जागे झाले. त्या क्षणी मी पापांना वचन दिले. हे वचन होते, मी सर्वोत्तम बनून दाखवणार. फोन ठेवल्यानंतर मी विचार केला. कुणासोबत बाहेर जाणे आणि एक बॉटल व्हिस्की पोटात रिचवणे म्हणजे स्वत:वर प्रेम करणे आहे? असा प्रश्न मी स्वत:लाच विचारला. मला उत्तर मिळाले, ‘नाही.’ त्या क्षणाला मी मद्यपान सोडण्याचा निर्णय घेतला.

Web Title: Pooja Bhatting 'This' always left liquor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.