पूजा बेदीची मुलगी सिनेमात झळकणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2017 01:16 IST2017-05-14T01:16:00+5:302017-05-14T01:16:00+5:30
स्टार किड्स म्हटले की, रसिकांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो.

पूजा बेदीची मुलगी सिनेमात झळकणार ?
स्टार किड्स म्हटले की, रसिकांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो. स्टार किड्स म्हटले तर त्यांची मुलेही सिनेमातच काम करणार, हे काही नवीन नसल्यामुळे त्यांच्या आई-वडिलांमुळेच अभिनय क्षेत्रात काही ना काही कारणामुळे स्टार किड्सची चर्चाही होतच असते. सध्या पूजा बेदीची मुलगी आलिया बेदी हिचे फोटो सोशल मीडियावर खूप हिट ठरत आहेत. फोटोत आलियाचा हॉट अंदाज पाहून तिला खूप साऱ्या चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्याचे पाहायला मिळते आहे. २०११च्या एका रिअॅलिटी शोमध्ये आलिया झळकली आहे. या शोमध्ये ती आपल्या आईसोबत स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. आलियाचे ग्लॅमरस फोटो पाहून तिला तिच्या मित्रमंडळींनी अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा सल्लाही दिला आहे.