‘या’ चित्रपटात सोनाली बनणार ‘पाहुणी’ कलाकार
By Admin | Updated: February 4, 2017 03:14 IST2017-02-04T03:14:22+5:302017-02-04T03:14:22+5:30
सध्या ‘बघतोस काय मुजरा कर’ चित्रपटाची चर्चा खूपच रंगत आहे. या चित्रपटात प्रेक्षकांचे लाडके कलाकार जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव, अक्षय टंकसाळे, पर्ण पेठे, नेहा जोशी

‘या’ चित्रपटात सोनाली बनणार ‘पाहुणी’ कलाकार
सध्या ‘बघतोस काय मुजरा कर’ चित्रपटाची चर्चा खूपच रंगत आहे. या चित्रपटात प्रेक्षकांचे लाडके कलाकार जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव, अक्षय टंकसाळे, पर्ण पेठे, नेहा जोशी, रसिका सुनील या कलाकारांचा समावेश आहे. आता या कलाकारांबरोबरच प्रेक्षकांना या चित्रपटात आणखी एक खास सरप्राईज असेल. हे सरप्राईज म्हणजे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत पाहायला मिळेल. तिच्या या कॅमियोविषयी सोनाली कुलकर्णी लोकमत सीएनएक्सला सांगते, ‘या चित्रपटातील माझी भूमिका अनपेक्षित आहे. लंडनमध्ये ही साधीभोळी मुले शिवाजीमहाराजांची तलवार घेण्यासाठी येतात. मात्र, या मुलांना लंडनमधील काहीच माहीत नसते. त्यावेळी या मुलांना एक मुलगी भेटते. या मुलीची भेट झाल्यानंतर ती त्या मुलांना मदत करते की नाही, हे कळण्यासाठी प्रेक्षकांना चित्रपट पाहावा लागेल.’ ही भूमिका कशी मिळाली, याविषयी सोनाली म्हणते, ‘पोस्टर गर्ल’ फेम दिग्दर्शक हेमंत ढोमे हा माझा खूपच खास मित्र बनला. या चित्रपटाची ज्यावेळी नुकतीच सुरुवात झाली होती, त्या वेळी हेमंतने मला या चित्रपटाची कथा ऐकवली. ती मला खूपच आवडली. या चित्रपटात मला साजेशी अशी एकही भूमिका नव्हती. पण, एक कॅमियो होता. हा कॅमियो कोण करणार? असे मी विचारले असता तो म्हणाला, ‘अजून काही ठरले नाही.’ पण मी मात्र हा कॅमिओ करणार असा हट्ट हेमंतकडे धरला. तसेच काही महिन्यांनंतर या कॅमिओसाठी मला हेमंतचा फोन आला. तो म्हणाला, ‘या चित्रपटातील पाहुण्या कलाकारांची भूमिका तुलाच करायची आहे. हे ऐकून मला खूपच आनंद झाला.’