Bigg Boss19 : द अंडरटेकर 'बिग बॉस'च्या घरात मुक्काम ठोकणार! सलमानसोबत टायसनची झलक दिसणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 20:25 IST2025-08-21T20:00:11+5:302025-08-21T20:25:36+5:30
'बिग बॉस'च्या घरात या दोन जगप्रसिद्ध चेहऱ्यांना वाइल्ड कार्ड एन्ट्री मिळणार असल्याचा मोठा गाजावाजा

भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय अन् वादग्रस्त रिअॅलिटी शो ठरलेल्या 'बिग बॉस'च्या १९ व्या हंगामात मोठा धमाका पाहायला मिळणार आहे.
सलमान खानच्या नव्या हंगामातील या शोमध्ये निर्माते दोन जगप्रसिद्ध चेहऱ्यांना वाइल्ड कार्ड एन्ट्री देणार असल्याचा मोठा गाजावाजा सध्या सुरु आहे.
वाइल्ड कार्ड एन्ट्रीच्या माध्यमातून 'बिग बॉस'च्या घरात येऊन इंटरनॅशनल खिलाडी ७ ते १० दिवस मुक्काम ठोकणार असल्याचेही बोलले जात आहे. कोण आहेत ते परदेशी पाहुणे जे बिग बॉसच्या घरात दिसणार असल्याची रंगतीये चर्चा जाणून घेऊयात सविस्तर
तो चेहरा म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे WWE च्या माध्यमातून जगभरात प्रसिद्ध असलेला अंडरटेकर. भारतीय चाहत्यांच्या मनात घर करणारा WWE च्या रिंगमधील माजी स्टार नोव्हेंबरमध्ये बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री मारणार असल्याचा दावा करण्यात येतोय.
जगातील महान अमेरिकन बॉक्सर माइक टायसन या दिग्गजाचे नावही 'बिग बॉस'मुळे चर्चेत आले आहे. हा चेहरा सलमान खानसोबत प्रमुख अतिथीच्या रुपात बिग बॉसच्या घरात दिसू शकतो. यासंदर्भात निर्माते जगप्रसिद्ध बॉक्सरसोबत चर्चा करत असल्याचे बोलले जाते.
सलमान खान कारभारी असल्यामुळे एका विशेष उंचीवर पोहचलेल्या या शोमध्ये जर या दोन चेहऱ्यांनी हजेरी लावली तर भारतीय चाहत्यांसाठी ती एक मोठी पर्वणीच ठरेल. पण याबद्दल अद्याप बिग बॉसच्या निर्मात्यांनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.