काय सांगता! सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्याला रोज लाळ लावते ही अभिनेत्री, म्हणाली- "आपल्या लाळेचा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 13:38 IST2025-01-08T13:26:08+5:302025-01-08T13:38:23+5:30

एक अशी अभिनेत्री आहे जी चेहऱ्यावरील ग्लो आणि सुंदरता वाढवण्यासाठी स्वत:च्याच लाळेचा वापर करते, हे सांगितल्यावर तुमचा विश्वास बसेल का?

सेलिब्रिटींना त्यांच्या त्वचेची योग्य ती काळजी घ्यावी लागते. अभिनेत्री स्किन केअरकडे विशेष लक्ष देताना दिसतात. काही अभिनेत्री यासाठी महागडे प्रोडक्ट वापरतात. तर काही स्किन ट्रीटमेंट घेतात.

पण, एक अशी अभिनेत्री आहे जी चेहऱ्यावरील ग्लो आणि सुंदरता वाढवण्यासाठी स्वत:च्याच लाळेचा वापर करते, हे सांगितल्यावर तुमचा विश्वास बसेल का?

ही अभिनेत्री म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून तमन्ना भाटिया आहे. अभिनेत्रीने स्वत:च तिच्या ब्युटी सिक्रेटचा खुलासा करताना ही गोष्ट सांगितली होती.

तमन्ना ही साऊथमधली लोकप्रिय आणि आघाडीची अभिनेत्री आहे. एका मुलाखतीत तमन्नाने तिच्या सौंदर्यामागचं रहस्य उलगडलं होतं.

पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत तमन्ना म्हणाली होती की "मी रोज सकाळी उठून माझी लाळ चेहऱ्याला लावते".

"आपल्या चेहऱ्यासाठी लाळ अत्यंत फायदेशीर ठरते. रात्रभर आपले तोंड बंद असते. ज्यामुळे अनेक बॅक्टेरिया तयार होतात".

"हे बॅक्टेरिया तोंडातील लाळेमुळे नष्ट होतात. ज्यामुळे आपल्याला आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही".

"आपण सकाळी उठल्यानंतर चेहऱ्यावर लाळ लावू शकता. यामुळे पुरळ, मुरुमांचे डाग, आणि जखमही बरी होण्यास मदत होते".