Mirzapur 3 ची सलोनी भाभी आहे तरी कोण? टीव्हीवर साकारली सीता; सीरिजमध्ये दिले बोल्ड सीन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 11:41 AM2024-07-10T11:41:23+5:302024-07-10T12:09:36+5:30

'मिर्झापूर 3' च्या सलोनी भाभी बद्दल जाणून घ्या

ओटीटीवर सर्वात गाजलेल्या सीरिजचा तिसरा सिझन आला आहे. 'मिर्झापूर 3'(Mirzapur 3) सध्या ओटीटीवर धुमाकूळ घालत आहे. यावेळी सीरिजमध्ये एका अभिनेत्रीने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय ती म्हणजे सलोनी भाभी.

'मिर्झापूर 3' ची सलोनी भाभी नक्की आहे तरी कोण? ही आहे अभिनेत्री नेहा सरगम (Neha Sargam). नेहाने सीरिजमध्ये दद्दा त्यागीच्या सूनेची भूमिका साकारली आहे. विजय वर्मा या सीझनमध्ये एकदम खतरनाक अवतारात दिसत आहे. तर नेहा त्याची पत्नी आहे.

मिर्झापूरमध्ये विजय वर्माचा डबल रोल होता. त्याने भरत त्यागी आणि शत्रुघ्न त्यागी अशा भूमिका केल्या होत्या. त्यांना बडे आणि छोटे असं बोलायचे. दुसऱ्या सीझनमध्ये 'छोटे'ची हत्या होते तर 'बडे' वाचतो. मात्र तो कुटुंबाला फसवत आपण छोटे असल्याचं सांगतो. अशात सलोनी आपल्या दीरासोबतच रोमान्स करते. दोघांचा बोल्ड सीनही सीरिजमध्ये दाखवण्यात आला आहे.

बिहारमध्ये जन्मलेल्या नेहाने MBA केलं आहे. तिला गायिका व्हायचे होते. नेहा शास्त्रीय संगीतात पारंगत आहे. मात्र तिच्या नशिबात अभिनेत्री होणंच लिहिलं होतं.

नेहा सरगम टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने 'रामायण','रामायण','डोली अरमानो की' या मालिकांमध्ये काम केलं आहे. इतकंच नाही तर तिला गायिकाही आहे.

'रामायण' मध्ये नेहाने सीता मातेची भूमिका साकारली होती. तर 'परमअवतार श्रीकृष्ण' मध्ये ती लक्ष्मीच्या भूमिकेत दिसली. २०२२ साली नेहाने 'यशोमति मैय्या के नंदलाला' मध्ये यशोदेची भूमिका साकारली होती.

नेहा टीव्ही क्षेत्रात खूप अॅक्टीव्ह आहे. आता ती'मिर्झापूर'मुळे वेबविश्वातही नावारुपाला आली आहे.

नेहा सरगमने इंडियन आयडॉल 2 आणि 4 साठी ऑडिशन दिली होती. मात्र एका अपघातामुळे ती पुढील राऊंडमध्ये जाऊ शकली नाही. नंतर तिला 'चांद छुपा बादल मे' मध्ये मुख्य अभिनेत्रीची भूमिका मिळाली.

'गुम है किसी के प्यार मे' फेम अभिनेता नील भट्टसोबत नेहाचं अफेअर होतं अशीही चर्चा होती. मात्र काही मतभेदांमुळे त्यांचं ब्रेकअप झालं.