'या' सीरिजला IMDB वर ८.५ रेटिंग, तुम्ही पाहिलीत? लवकरच येतोय तिसरा सीझन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 16:44 IST2025-06-20T16:34:32+5:302025-06-20T16:44:44+5:30

जर, थिएटरपेक्षा कमी पैशात घरबसल्या मनोरंजन हवं असेल तर पाहा ही सीरिज

तुम्हाला क्राईम, थ्रिलर आणि रहस्याने भरलेल्या वेबसीरिज पाहायला आवडतात? तर तुमच्यासाठी एक भन्नाट पर्याय आहे, सस्पेन्सने भरलेली ही क्राईम सीरिज ऑल टाइम फेवरेट आहे.

केवळ कथा नाही, तर अभिनय, दिग्दर्शन आणि सिनेमॅटोग्राफी सुद्धा दमदार आहे. विशेष म्हणजे या सीरिजला चांगलं रेटिंग दिलं आहे.

सत्य घटनांवर आधारित या सीरिजनं प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार (Emmy Awards) जिंकलाय. त्यामुळे क्राईम-थ्रिलर प्रेमींनी ही सीरिज नक्कीच मिस करू नये. तर ही सीरिज कोणती आहे, हे जाणून घेऊया.

ही सीरिज आहे 'दिल्ली क्राइम'. या सीरिजचा पहिला सीझन २०१९ मध्ये आला होता. पहिला सीझन हा दिल्लीत घडलेल्या हृदयद्रावक 'निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणावर' आधारित होता.

या सीरिजच्या कथेवर दिग्दर्शक रिची मेहता यांनी जवळजवळ सहा वर्षे रिसर्च केला होता. त्यानंतर सीरिजचं शुटिंग फक्त ६२ दिवसांत पूर्ण केलं होतं.

दिग्दर्शक रिची मेहता यांनी अत्यंत संवेदनशीलतेने आणि गांभीर्याने शुटिंग केलं होतं. ४८ व्या आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार सोहळ्यात या वेबसीरिजने 'सर्वोत्कृष्ट ड्रामा सीरिज'चा पुरस्कार जिंकला होता.

या सीरिजमधील शेफाली शाहच्या अभिनयाने सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं. या सीरिजला आयएमडीबीवर ८.५ रेटिंग आहे.

सीझन १ आणि २ च्या यशानंतर नेटफ्लिक्सने 'दिल्ली क्राइम' या लोकप्रिय सीरिजच्या सीझन ३ ची घोषणा केली. मानवी तस्करी सारख्या गंभीर गुन्ह्यांचा तपास तिसऱ्या सीझनमध्ये पाहायला मिळणार आहे.

ही सीरिजचे दोन्ही सीझन हे नेटफ्लिक्स (Netflix) वर उपलब्ध आहेत. तिसऱ्या सीझनच अधिकृत घोषणा झाली असली तरी अद्याप नेमकी सीरिज कधी प्रदर्शित होणार, हे समोर आलेलं नाही.