गोव्यात रंगली मौनी रॉयची ‘बॅचलर पार्टी’! पाहा, गर्लगँगसोबतचे तिचे धम्माल फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 01:06 PM2021-12-19T13:06:50+5:302021-12-19T13:15:34+5:30

बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा धडाका सुरू आहे. लवकरच अभिनेत्री Mouni Roy लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. चर्चेला कारणही खास आहे.

बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा धडाका सुरू आहे. लवकरच अभिनेत्री मौनी रॉय लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. चर्चेला कारणही खास आहे. होय, मौनीचे गर्लगँगसोबत पार्टी करतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत.

हे मौनीच्या बॅचलर पार्टीचे फोटो असल्याचे मानले जात आहेत. एका फोटोत मौनीच्या हातात प्लेकार्ड आहे आणि सर्वांनी ब्लॅक कलरचा गाऊन घातलेला आहे.

मौनी तिचा बॉयफ्रेन्ड सूरज नांबियारसोबत लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे. अद्याप मौनी यावर काहीही बोललेली नाही. पण हे पार्टीचे फोटो खूप बोलके आहेत. मौनीचे हे फोटो टीव्ही अभिनेत्री आशका गोराडियाने शेअर केले आहेत.

फोटोमध्ये मौनी तिच्या गर्ल गँगसोबत एन्जॉय करताना दिसत आहे. मौनी सध्या गोव्यात आहे.

फोटोंच्या माध्यमातून आशकाने मौनीच्या बॅचलर पार्टीची हिंट दिली आहे. यात सर्वजणी धम्माल मस्ती करताना दिसत आहेत.

लॉकडॉऊनच्या काळात मौनी अनेक महिने दुबईत होती. दुबईत मौनीची बहीण पती व मुलांसोबत राहते. याचठिकाणी तिची सूरजसोबत ओळख झाली.

मौनीने काही महिन्यांपूर्वी सूरजसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. मात्र नंतर हा फोटो डिलीटही केला होता.

इतकंच नाही तर मौनीने सूरज आणि त्याच्या कुटुंबासोबतचा एक फोटो शेअर केला होता. यात तिने सूरजच्या आईवडिलांना मॉम आणि डॅड म्हटले होते.

मौनीने आपल्या करिअरची सुरुवात बॅकग्राऊंड डान्सर म्हणून केली होती. पहिल्यांदा रन सिनेमातील एका गाण्यात बॅकग्राऊंड डान्सर म्हणून ती दिसली होती. त्यानंतर एकता कपूरच्या क्योंकी सास भी कभी बहू थी या मालिकेत तिला काम करण्याची संधी मिळाली.

यानंतर मौनी 'नागिन', 'नागिन 2', 'कस्तूरी', 'जुनून-ऐसी नफरत' अशा मालिकेांमध्ये झळकली. 2018 मध्ये अक्षय कुमारसोबत 'गोल्ड' सिनेमाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. यानंतर ती रोमियो अकबर वाल्टर, मेड इन चायना सिनेमात दिसली.