विकी कौशलने बदलला लुक, त्याला ओळखणे देखील झाले कठीण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 16:50 IST2019-05-06T16:37:38+5:302019-05-06T16:50:01+5:30

संजू, उरीः द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटांमुळे विकी कौशलची लोकप्रियता चांगलीच वाढली आहे.
विकी सध्या सरदार उधम सिंह या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे.
सरदार उधम सिंह या चित्रपटाच्या चित्रीकरणाचे काही फोटोदेखील विकीने सोशल मीडियावर पोस्ट केले होते.
विकीला नुकतेच मुंबईत एका रेस्टॉरंटच्या बाहेर पाहाण्यात आले. त्यावेळी त्याने पांढरा शर्ट आणि ब्ल्यू पँट घातली होती.
विकीने केस देखील बारीक कापले असून त्याला या लूकमध्ये ओळखणे देखील कठीण झाले आहे.