नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर उद्धाटन प्रसंगी दिग्गज कलाकार, राजकारण्यांची मांदियाळी, पाहा Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 08:42 AM2023-04-01T08:42:13+5:302023-04-01T09:09:33+5:30

Nita Mukesh Ambani Cultural Centre : नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचं उद्घाटन शुक्रवारी देश-विदेशी कलाकार, धार्मिक नेते, क्रीडा आणि व्यावसायिक व्यक्तींच्या उपस्थितीत पार पडलं.

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचं (Nita Mukesh Ambani Cultural Centre) उद्घाटन शुक्रवारी देश-विदेशी कलाकार, धार्मिक नेते, क्रीडा आणि व्यावसायिक व्यक्तींच्या उपस्थितीत पार पडलं.

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन या उद्घाटनप्रसंगी उपस्थित होत्या. एथनिक लूकमध्ये दोघीही अतिशय सुंदर दिसत होत्या.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या कल्चर सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी आपली पत्नी अंजली तेंडुलकर आणि कन्या सारा तेंडुलकर यांच्यासह उपस्थित होता. क्रीडा क्षेत्रातील दिग्गजही या कार्यक्रमाला उपस्थित होते.

दिग्गज अभिनेते सुपरस्टार रजनीकांत यांनी या उद्घाटन प्रसंगी उपस्थिती दर्शवली. याशिवाय या ठिकाणीआंतरराष्ट्रीय कलाकारांनीदेखील उपस्थिती लावली.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होता. यावेळी त्यानं कॅमेऱ्यासमोर पोझही दिले.

शाहीद कपूरनं आपली पत्नी मीरासह नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी हजेरी लावली.

करिना कपूर आणि सैफ अली खान हे कल्चरल सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित होते.

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगदेखील यावेळी उपस्थित होते. त्यांच्याशिवाय अनुपम खेर, जावेद अख्तर, शबाना आझमी, सुनील शेट्टी यांनीदेखील कार्यक्रमाला हजेरी लावली.

निक जोनस आणि प्रियंका चोप्रा या कार्यक्रमादरम्यान उपस्थितीत होते. देशविदेशातील अनेक कलाकार या कार्यक्रमात सहभागगी झाले होते.

अभिनेता शाहरुख खान याची पत्नी गौरी खान, आर्यन खान आणि सुहाना हे कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते. परंतु शाहरूख या इव्हेंटदरम्यान दिसला नाही.

बॉलिवूडचे न्यूली वेड कपल कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ कपूर या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते.

सोनम कपूरनं या उद्घाटनप्रसंगी हजेरी लावली. कॅमेऱ्याला तिनं यावेळी पोझही दिल्या.