Urfi Javedचं Ex-Boyfriendसोबत झालं पॅचअप ? जाणून घ्या कोण आहे तिचा एक्स बॉयफ्रेंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 15:41 IST2022-10-31T15:36:20+5:302022-10-31T15:41:44+5:30

Urfi Javed : उर्फी जावेद बऱ्याचदा हटके फॅशन स्टाईलमुळे चर्चेत येत असते.

उर्फी जावेद ही इंडस्ट्रीतील सर्वात ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे. अनेकदा उर्फी नव्या लूकमध्ये पाहायला मिळते. तिचे पोशाख इतरांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. अशा परिस्थितीत उर्फीबद्दल अनेक चर्चा होत असून तिच्या फॅशन सेन्सचेही कौतुक होत आहे.

कपड्यांव्यतिरिक्त उर्फीच्या नात्याच्याही चर्चा होताना दिसतात. काही काळापूर्वी ती तिचा एक्स बॉयफ्रेंड पारस कालनावतसोबत दिसली होती.

उर्फी जावेदने १५ ऑक्टोबर रोजी वाढदिवस साजरा केला. बर्थडे सेलिब्रेशनसाठी उर्फी तिच्या मैत्रिणींसोबत गोव्याला गेली होती. या पार्टीत पारसही तिच्यासोबत होता.

पारस कालनावतनेही सोशल मीडियावर उर्फीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. याशिवाय दोघेही पार्टीत एकत्र एन्जॉय करताना दिसले.

उर्फी आणि पारसचे ब्रेकअप खूप वाईट होते हे सर्वांनाच माहीत आहे. अशा परिस्थितीत दोघांचे आनंदी फोटो पाहिल्यानंतर हे दोघे पुन्हा एकदा रिलेशनशिपमध्ये आल्याची अटकळ बांधली जात होती.

याबाबत उर्फीनं सांगितले, की असं काही नाही. तिने पारसला तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी बोलावले होते, पण ती पुन्हा या अभिनेत्याला डेट करत नाहीये.

ती म्हणाली, 'आम्ही एकमेकांसोबत आनंदी आहोत. माझ्या वाढदिवसाला मी त्याला आमंत्रित केले होते. आपण आपला भूतकाळ मागे सोडला आहे. आता आम्ही फक्त मित्र आहोत.

उर्फी जावेद आणि पारस कालनावत यांची भेट 'मेरी दुर्गा' या मालिकेच्या सेटवर झाली होती. दोघांची मैत्री झाली आणि नंतर त्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. मात्र, नंतर हे नाते बिघडले.

टेली स्टार्स टॉक्स या शोमध्ये उर्फीने पारससोबतचे तिचे नाते बालपणीची चूक असल्याचे सांगितले होते. ती म्हणाली होती की, 'मला त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर केवळ एक महिन्यातच ब्रेकअप करायचे होते. तो लहान मूल होता. तो खूप possessive होता.

मला पुन्हा आकर्षित करण्याच्या प्रयत्नात त्याने माझ्या नावाचे तीन टॅटू काढले. पण वेगळे झाल्यानंतर हे कोण करते? साहजिकच मी टॅटूसाठी त्याच्याकडे जाणार नव्हतो. भलेही त्याने माझ्या नावाचा टॅटू अंगभर गोंदवला असता. तरीदेखील मी त्याच्याकडे परत गेले नसते.