"घटस्फोटावर माझा विश्वास नाही, लग्नानंतर...", थलपति विजयसोबत विवाहबाह्य संबंध असलेल्या तृषाने लग्न का केलं नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 12:22 IST2026-03-07T12:16:31+5:302026-03-07T12:22:12+5:30

४२ वर्षांची तृषाने अद्याप लग्न केलेलं नाही. याबाबत तिला विचारण्यात आलं होतं.

साऊथ सुपरस्टार थलपति विजय त्याच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. थलपति विजय पत्नी संगीतापासून घटस्फोट घेत वेगळं होणार आहे.

थलपति विजयचं साऊथ ब्युटी तृषा कृष्णनसोबत एक्स्ट्रा मरेटियल अफेअर असल्याचं बोललं जात होतं. या चर्चा सुरू असतानाच थलपति विजय आणि तृषा एका लग्नात एकत्र दिसले.

त्यामुळे त्यांच्या रिलेशनशिपबाबत जवळपास शिक्कामोर्तब झालेलं आहे. ४२ वर्षांची तृषाने अद्याप लग्न केलेलं नाही. याबाबत तिला विचारण्यात आलं होतं.

एका मुलाखतीत तृषाला सिंगल राहण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा ती म्हणाली होती की "त्या व्यक्तीसोबत मी माझं बाकीचं आयुष्य घालवू शकते हे फिलिंग मला आलं पाहिजे".

"घटस्फोटावर माझा विश्वास नाही. मला लग्नानंतर घटस्फोट झालेला नकोय आणि मी अशी व्यक्ती आहे जे हे करू शकते".

"मी असे काही कपल्स बघितले आहेत जे लग्नानंतर एकत्र खूश नाहीत. काही जण कुटुंबासाठी, मुलांसाठी, समाजातील प्रेशरमुळे एकत्र राहतात".

"अशा प्रकारच्या रिलेशनशिपमध्ये मला राहायचं नाही. त्यामुळे लवकर लग्न करण्यापेक्षा मी योग्य व्यक्तीची वाट पाहीन".