PHOTOS: साऊथचा सुपरस्टार महेश बाबूची व्हॅनिटी व्हॅन शाहरूख खानच्या व्हॅनपेक्षाही आहे महाग, पाहा INSIDE PICS

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 14:13 IST2022-08-09T13:59:13+5:302022-08-09T14:13:28+5:30

महेश बाबूकडे सर्व सोयीसुविधा असलेली एक लक्झरी व्हॅनिटी व्हॅन आहे. त्याची ही व्हॅनिटी व्हॅन शाहरूख खानच्या व्हॅनिटी व्हॅनपेक्षा जास्त महागडी आहे.

साऊथ इंडस्ट्रीतील अनेक स्टार्स खूप लोकप्रिय आहेत. पण यात एक असा सुपरस्टार आहे, ज्याचे जगभर चाहते आहेत. त्याचे नाव महेशबाबू. आज त्याचा वाढदिवस. (Photo Instagram)

9 ऑगस्ट 1975 रोजी चेन्नईत जन्मलेल्या महेशबाबूने बालकलाकार म्हणून अभिनय कारकिर्दीची सुरूवात केली होती. यानंतर 1999 मध्ये ‘राजकुमारूदु’ या सिनेमातून त्याने मुख्य अभिनेता म्हणून डेब्यू केला. (Photo Instagram)

आपल्या लूकने, अभिनयाने आणि धमाकेदार अ‍ॅक्शनने तो प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत त्याचे फॅन्स आहेत. (Photo Instagram)

त्याच्या लाइफस्टाईलबाबत माहिती जाणून घेणं त्याच्या फॅन्सना नेहमीच आवडतं. आज आम्ही तुम्हाला महेश बाबूच्या लक्झरी बंगल्यासारख्या लक्झरी व्हॅनीटीची सफर करवणार आहोत. (Photo Instagram)

महेश बाबूकडे सर्व सोयीसुविधा असलेली एक लक्झरी व्हॅनिटी व्हॅन आहे. या व्हॅनिटीची किंमत वाचून तुम्ही हैराण व्हाल. (Photo Instagram)

महेश बाबूच्या व्हॅनिटी व्हॅनची किंमत जवळपास ६.०२ कोटी रुपये इतकी आहे.(Photo Instagram)

त्याची ही व्हॅनिटी व्हॅन शाहरूख खानच्या व्हॅनिटी व्हॅनपेक्षा जास्त महागडी आहे. (Photo Instagram)

महेश बाबू आणि नम्रता यांचा हैदराबादमधील जुबली हिल्समध्ये बंगला आहे. या बंगल्याची किंमत जवळपास १४ कोटी रुपये आहे. (Photo Instagram)

महेश बाबूने करियरची सुरूवात वयाच्या चौथ्या वर्षी बालकलाकार म्हणून केली होती. महेश बाबूने १९९९ साली 'राजा कुमारुदु' चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केलं. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री प्रिती झिंटा मुख्य भूमिकेत होती. (Photo Instagram)

महेश बाबू शाळेत होते तेव्हा मित्रांना आपल्या वडिलांचं नाव सांगत नव्हते. त्यांच्या वडिलांनीच त्यांना असं करायला सांगितलं होतं. कारण महेश बाबूच्या वडिलांना त्याने त्यांच्या नावाचा वापर करू नये असं वाटत होतं. (Photo Instagram)

महेश बाबूच्या पर्सनल लाईफबद्दल सांगायचं तर त्याने अभिनेत्री नम्रता शिरोडकरसोबत २००५ साली लग्न केले. महेश बाबू व नम्रता यांची पहिल्यांदा भेट २००० साली वामसी चित्रपटादरम्यान झाली होती. लग्नाच्या आधी पाच वर्षे त्यांनी एकमेकांना डेट केलं होतं. (Photo Instagram)