सलमान, शाहरुखच्या बॉडीगार्डचा पगार कोट्यवधीत?; युसूफ इब्राहिम यांनी केली पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 17:21 IST2025-01-11T17:10:57+5:302025-01-11T17:21:42+5:30

बॉलिवूड सेलिब्रिटी यांना भेटण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असतो परंतु जो यांच्या सर्वात जवळचा असतो तो म्हणजे बॉडीगार्ड..एखाद्या चाहत्याला किंवा गर्दीच्या गराड्यात सेलिब्रिटीच्या जवळही तो येऊ देत नाही. सेलिब्रिटींना सुरक्षा पुरवणे ही त्यांची जबाबदारी असते. पैपराजीही यांच्यापासून वाचत नाहीत.

अलीकडेच सेलिब्रिटी सिक्युरिटी कंसल्टेंटचे युसूफ इब्राहिम यांची पॉडकास्ट मुलाखत समोर आली. युसूफ इब्राहिम हे ए लिस्टर्स बॉलिवूड सेलिब्रिटींना प्रोटेक्शन देतात. त्यात वरूण धवन, आलिया भट्ट, रणबीर कपूर यांच्या नावाचा समावेश आहे. युसूफ यांनी त्यांच्या मुलाखतीत अनेक गोष्टींचा माध्यमांसमोर खुलासा केला.

बॉलिवूड सेलिब्रिटींच्या बॉडीगार्डचा पगार नेहमी चर्चेत असतो, या मुलाखतीत इब्राहिम म्हणाले की, अनेक सेलिब्रिटीचे बॉडीगार्ड्स खूप मोठा पगार घेतात. सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा आणि शाहरूख खानचा बॉडीगार्ड रवी सिंह यांचे नाव प्रामुख्याने समोर येते. हे दोघेही कोट्यवधीत सॅलरी घेतात.

शेरा तर सलमानला मालिक म्हणतो, सोशल मीडियात त्याचे अनेक फोटो आहेत. सध्या शेराचा मुलगाही बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याचं प्लॅनिंग करतोय. गेल्या २० वर्षाहून अधिक काळ शेरा सलमान खानसोबत आहे. प्रामाणिकपणा, प्रोफेशनल वागणुकीमुळे सलमानचा तो अत्यंत विश्वासू बनला आहे. शेराची स्वत:चीही सिक्युरिटी एजेन्सी आहे. ज्याचं नाव टायगर सिक्युरिटी आहे.

दुसरीकडे शाहरूख खानचा बॉडीगार्ड रवी सिंहही कमी नाही. सार्वजनिक ठिकाणी असो वा शाहरुखच्या मुलांना सिक्युरिटी देणे ते सर्व रवीच सांभाळतो. शाहरुख रवीला वर्षाला २.७ कोटी रुपये पगार देतो का असा प्रश्न युसूफ यांना विचारला तेव्हा आम्हाला कोणता सेलिब्रिटी किती पगार देतो हे माहिती नाही परंतु इतकी मोठी रक्कम शक्य नाही असं त्यांनी सांगितले.

तर सलमान खान बॉडीगार्ड शेराला २ कोटी रुपये पगार देतो, त्यावर युसूफ यांनी म्हटलं, शेराचा स्वत:चा बिझनेस आहे. टायगर सिक्युरिटी नावाने कंपनी आहे. शेरा यांचे अन्य अनेक बिझनेस आहेत. त्यामुळे कदाचित ते इतकी रक्कम कमवतही असतील किंवा यापेक्षा अधिक कमाई असू शकते.

मध्यंतरी अक्षय कुमार बॉडीगार्डला १-२ कोटी सॅलरी देतो अशी बातमी आली होती, त्यावरही युसूफ यांनी माझ्याकडे वैयक्तिक माहिती नाही. जर ते इतका पगार देत असते तर महिन्याला १०-१२ लाख होतात ते शक्य नाही. बॉडीगार्डबाबत अनेक गोष्टी असतात. अभिनेता कुठे शूटला जातोय, प्रमोशनसाठी आहे की इव्हेंटसाठी जातोय. प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी रक्कम असते.

त्याशिवाय पूर्ण महिना एक्टर्स किती ठिकाणी जाऊन काम करतोय, त्याच्यासोबत बॉडीगार्ड असतो का हे महत्त्वाचे आहे. बॉडीगार्डच्या पगाराचे अनेक फॅक्टर आहेत. माध्यमे केवळ बातम्या छापण्याचं काम करतात परंतु सत्य काही वेगळेच असते. बॉडीगार्डला प्रतिदिन कमीत कमी ५ ते ८ हजार आणि जास्तीत जास्त २०-२५ हजार दिले जातात.

बॉडीगार्ड क्षेत्रात प्रामाणिकपणाला महत्त्व आहे. सेलिब्रिटींसोबत फोटो काढण्यासाठी काही पैसे घेतात ते जास्त दिवस टिकत नाही. काही बॉडीगार्ड वर्षोनुवर्षे एकाच सेलिब्रिटींकडे काम करत आहेत. त्यांच्यावर सेलिब्रिटींचा विश्वास बनला आहे. ते प्रामाणिकपणे काम करतात म्हणून बसला आहे असंही युसूफ इब्राहिम यांनी सांगितले.

बॉडीगार्डच्या पगाराबाबत अनेक बातम्या येतात परंतु ते फार सत्य नाही. ८-१० लाख महिना बॉडीगार्ड कमवतो असं बोलणे योग्य आहे का, आज काम करणारे खूप लोक आहेत. परंतु बॉडीगार्डला पगारासोबतच सेलिब्रिटीकडून चांगले सहकार्य मिळते, मेडिकल खर्च, मुलांच्या शिक्षणासाठी होणारा खर्च दिला जातो. अनेक कलाकार त्यांच्यासोबत काम करणाऱ्यांना आर्थिक मदत करतात असं युसूफ इब्राहिम यांनी सांगितले.