गुलाबी साडीतल्या रिंकू राजगुरूच्या फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष, एकदा पाहा हे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 13:15 IST2024-05-09T13:11:54+5:302024-05-09T13:15:22+5:30
Rinku Rajguru : नुकतेच रिंकू राजगुरूने गुलाबी रंगाच्या कॉटन साडीत फोटोशूट केले आहे.

अभिनेत्री रिंकू राजगुरू सातत्याने चर्चेत येत असते. कधी चित्रपटामुळे तर कधी ग्लॅमरस फोटोंमुळे.
नुकतेच रिंकू राजगुरूने गुलाबी रंगाच्या कॉटन साडीत फोटोशूट केले आहे. यात तिने फारसा मेकअप केलेला दिसत नाहीये.
रिंकूने या साडीत एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत. साडीत तिने फिगरदेखील फ्लॉन्ट केली आहे.
रिंकू राजगुरूच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळत आहे. यापूर्वीही रिंकूने साडीत फोटोशूट केले आहे.
तिने हे साडीतले फोटो शेअर करत लिहिले की, उन्हाळा + कॉटन साडी = प्रेम.
रिंकू राजगुरू शेवटची झिम्मा २ सिनेमात झळकली होती.
या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता.
रिंकू राजगुरू ग्लॅमरस फोटोंमुळेही चर्चेत येत असते.