छोट्या पडद्यावरील मराठमोळ्या संस्कारी सूनेचा ग्लॅमरस लूक, फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 01:13 PM2024-05-07T13:13:30+5:302024-05-07T13:18:36+5:30

Yogita Chavan : 'जीव माझा गुंतला' या मालिकेतील अंतराची भूमिका साकारणारी अभिनेत्री योगिता चव्हाणचे लेटेस्ट फोटो आले चर्चेत

छोट्या पडद्यावरील जीव माझा गुंतला या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे योगिता चव्हाण.

मालिकेत मुख्य भूमिका साकारून योगिता चव्हाण घराघरात पोहचली आहे.

मालिकेतील तिच्या अंतराच्या भूमिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.

छोट्या पडद्यावर साधी भोळी रिक्षावाली साकारणारी अभिनेत्री योगिता चव्हाण खऱ्या आयुष्यात खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस आहे.

सोशल मीडियावर ती नेहमीच फोटो आणि व्हिडीओ शेअर करून चर्चेत येत असते.

नुकतेच तिने ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. ज्यातून तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

फोटोत योगिताचा मनमोहक अंदाज पाहायला मिळत आहे.

तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे. ते या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहेत.

योगिता चव्हाणने ३ मार्च रोजी अभिनेता सौरभ चौघुले सोबत लग्न केले.