अन् UPSC ट्युशनची फी २.५ लाखांवरुन ७.५ हजार, खान सरचा किस्सा ऐकून सारेच भावूक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 02:14 PM2023-01-11T14:14:14+5:302023-01-11T14:24:59+5:30

नुकत्याच झालेल्या कपिल शर्माच्या एपिसोडमध्ये कपिलने तीन सोशल मीडिया स्टार्सं, आणि मोटीव्हेशनल स्पीकर्संना निमंत्रित केले होते. त्यामध्ये, खान सर यांनीही आपले अनुभव शेअर केले.

कॉमेडियन कपिल शर्मा शो मध्ये कपिल नेहमीच बॉलिवूड स्टार्स आणि सेलिब्रिटींना आमंत्रित करत असतो. काहीवेळा क्रिकेटर्संनाही तो आपल्या मंचावर बोलवतो.

कपिलच्या गुड सेन्स ऑफ ह्युमरमुळे त्याचा हा शो जगभरात लोकप्रिय आहे. त्यामुळेच, या शोचा टीआरपीही अधिक आहे. अनेकदा कपिल सेलिब्रिटींची टिंगलही उडवताना शोमध्ये पाहायला मिळतो.

चित्रपटाच्या प्रमोशन्ससाठी कपिल सेलिब्रिटींना आमंत्रित करतो आणि प्रमोशनासह हास्याचे फवारे उडवत देशातील चाहत्यांचं मनोरंजन करत असतो.

नुकत्याच झालेल्या कपिल शर्माच्या एपिसोडमध्ये कपिलने तीन सोशल मीडिया स्टार्सं, आणि मोटीव्हेशनल स्पीकर्संना निमंत्रित केले होते. त्यामध्ये, खान सर यांनीही आपले अनुभव शेअर केले.

खान सरच्या युट्यूब चॅनेलचे तब्बल १९ मिलियन्स म्हणे १ कोटी ९० लाख सबस्क्राईबर्स असून ते १२ वी सह युपीएससी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शिक्षण देतात.

खान सरांनी सांगितलेल्या दोन अनुभवामुळे नेहमीच हास्यकल्लोळात असलेल्या कपिल शर्मा शोमध्येही भावनिक वातावरण पाहायला मिळालं. कपिल आणि अर्चना पूरणसिंगही भावूक झाल्या होत्या.

माझ्याकडे अशीही मुले ट्युशनसाठी येतात, जे मजदूरी करुन किंवा लोकांच्या घरची धुणी-भांडी करुन आपलं शिक्षण पूर्ण करतात. अशा विद्यार्थ्यांकडून फीज घेताना हात थरथरतो, असे खान सर यांनी म्हटले. त्यावेळी, संपूर्ण शोमध्ये शांतता पसरली होती, वातावरण भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

युपीएससी परीक्षेसाठी असलेली ट्युशन फी २.५ लाखांवरुन मी ७५०० रुपयांवर आणली. आजही एका विषयासाठी केवळ २०० रुपये फी मी घेतो, असे खान सर यांनी सांगितले. कारण, आम्हीही हे दिवस पाहिलेत, असेही ते म्हणाले.

या देशातील कुठल्याही मुलाचं शिक्षण हे केवळ फी नसल्यामुळे राहता कामा नये, असे माझं स्वप्न आहे. त्यामुळेच, मी विद्यार्थ्यांना शक्य तितकी मदत करण्याचं काम खान सर करतात.

खान सर यांच्यावर या व्यवसायिक स्पर्धेतून हल्लाही झाला होता. त्यांच्या क्लासेस इंस्टीट्युटवर गावठी बॉम्ब फेकण्यात आले होते. मात्र, लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन क्लासेस सुरू केले अन् विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला, असेही ते सांगतात.