जयपूरमधील आलिशान पॅलेसमध्ये ही अभिनेत्री अडकणार लग्नबेडीत, पाहा पॅलेसचे Inside Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 16:16 IST2022-10-20T16:11:18+5:302022-10-20T16:16:21+5:30
ही अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे.

अभिनेत्री हंसिका मोटवानीच्या लग्नाच्या बातम्या समोर येत आहेत. ही अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री हंसिका मोटवानी यावर्षी डिसेंबर महिन्यात लग्न करणार आहे. त्यासाठी जयपूरचा एक राजेशाही पॅलेसही बुक करण्यात आला आहे.
अभिनेत्री हंसिका मोटवानी जयपूरच्या मुंडोटा फोर्ट आणि पॅलेसमध्ये लग्न करणार असल्याचे सांगितले जात आहे. हा अतिशय विस्तीर्ण महाल आहे. जिथे एक दिवसाच्या मुक्कामाचे भाडेही खूप जास्त आहे.
हंसिका मोटवानीच्या लग्नासाठी बुक केलेला मुंडोटा किल्ला जयपूर विमानतळापासून ४० किलोमीटर अंतरावर आहे. जिथे हंसिका मोटवानीच्या लग्नासाठी पाहुण्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हंसिका मोटवानीच्या लग्नाच्या तारखा सध्या गुप्त ठेवण्यात आल्या आहेत. पण हे लग्न डिसेंबर २०२२ मध्येच होणार आहे. त्यासाठी मुंडोटा किल्ल्यातील कर्मचाऱ्यांनाही काम सोपवण्यात आले आहे.
हंसिका मोटवानीच्या लग्नाचे ठिकाण मुंडोटा किल्ला सुमारे ४५० वर्षे जुना आहे. जिथे अभिनेत्रीचे भव्य लग्न होणार आहे.
इंडिया टीव्हीच्या रिपोर्टनुसार, मुंडोटा किल्ल्यातील सर्वात विस्तृत सूट वधू-वरांसाठी बुक करण्यात आला आहे. ज्याचे भाडे प्रति रात्र ६० हजार रुपये आहे.
मुंडोटा पॅलेसमध्ये पाच वेगवेगळ्या आलिशान सुट आहेत आणि प्रत्येक सूटचा स्वतःचा वैयक्तिक पूल आणि टेरेस आहे. त्यामुळे हे ठिकाण अगदी क्लासिक आहे.
मुंडोटा पॅलेसमध्ये पाच वेगवेगळ्या आलिशान सुट आहेत आणि प्रत्येक सूटचा स्वतःचा वैयक्तिक पूल आणि टेरेस आहे. त्यामुळे हे ठिकाण अगदी क्लासिक आहे.
हंसिका मोटवानीच्या लग्नाचे ठिकाण मुंडोटा किल्ला आतून खूप आलिशान आहे.