मराठमोळ्या या अभिनेत्रीचा जुना फोटो पाहून व्हाल अवाक्, म्हणाल - 'कोण होतीस तू, काय झालीय तू...!'
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 18:03 IST2021-06-09T17:54:15+5:302021-06-09T18:03:38+5:30
मराठमोळ्या अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचा जुना आणि आताचा फोटो शेअर करून तिच्यात घडलेला बदल दाखवला आहे.

मराठमोळी अभिनेत्री रुपाली भोसलेने सोशल मीडियावर तिचा जुना आणि आताचा फोटो शेअर करून तिच्यात घडलेला बदल दाखवला आहे.
रुपाली भोसलेने फोटो शेअर करत आधी आणि नंतर असे लिहिले. तिच्यात झालेला हा बदल पाहून सर्वजण थक्क झाले आहेत.
बऱ्याच जणांना तिचा जुना फोटो पाहून ती रुपाली आहे, यावर विश्वासच बसत नाही आहे.
रुपाली भोसलेच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
रुपाली भोसले सध्या आई कुठे काय करते या मालिकेत संजनाची भूमिका साकारताना दिसते आहे.
रुपाली भोसलेने साकारलेल्या संजनाच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते आहे.
रुपाली भोसले सुमीत राघवनसोबतची 'बडी दूर से आये है' ही मालिका प्रचंड गाजली होती.
यानंतर रुपाली छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात झळकली.
रुपाली भोसले ही अनेक वर्षे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहे.
मात्र रुपाली खऱ्या अर्थाने बिग बॉस मराठाच्या दुसऱ्या पर्वातून लोकांच्या घराघरात पोहोचली.