'तू भेटशी नव्याने' फेम मराठी अभिनेत्री शिवानी सोनारचा 'एक उनाड दिवस'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 16:34 IST2024-07-31T16:27:13+5:302024-07-31T16:34:25+5:30

शिवानी सोनारने तिचा होणारा पती आणि मित्रांसोबत धमाल मस्ती केलेली दिसली (shivani sonar)

शिवानी सोनार ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. शिवानी सोनार सध्या तू भेटशी नव्याने मालिकेत अभिनय करत आहे

शिवानी सोनारने सोशल मीडियावर फोटो शेअर केलेत. शिवानी मार्व्हल्सच्या टीशर्टमध्ये एकदम झकास दिसतेय

शिवानी सोनारने मालिकेच्या शूटींगमध्ये वेळात वेळ काढत मित्र आणि होणाऱ्या नवऱ्यासोबत वेळ घालवला आहे

शिवानी सोनार लवकरच अंबर गणपुलेसोबत लग्न करणार आहे. काहीच महिन्यांपूर्वी तिने साखरपुडा केला होता

शिवानी सोनारचे मित्र तिच्यासोबत धमाल करताना दिसत आहेत. शिवानीने मित्रांसोबत मनमुराद गप्पा मारत वेळ घालवला आहे

शिवानी सोनार ही तू भेटशी नव्याने मालिकेत झळकत आहे. या मालिकेत ती गौरीची भूमिका साकारत आहे

शिवानी सोनारसोबत अभिनेता सुबोध भावे झळकत आहे. सुबोध-शिवानी दोघांच्याही या नवीन मालिकेला प्रेक्षकांंचं प्रेम मिळालं आहे

टॅग्स :मराठीmarathi