TRP List Week 8:हिंदी टेलिव्हिजनवरील मालिका 'अनुपमा'ने टीआरपीच्या शर्यतीत मारली बाजी, या आहेत टॉप ५ मालिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 18:57 IST2022-03-04T18:57:12+5:302022-03-04T18:57:12+5:30

2022 च्या 8 व्या आठवड्याचा TRP अहवाल जाहीर झाला आहे. बघूया कोणत्या शोला प्रेक्षकांचे प्रेम मिळतंय आणि कोणता शो यादीतून गायब आहे.
रुपाली गांगुली आणि गौरव खन्ना स्टारर 'अनुपमा' या यादीत पुन्हा एकदा आघाडीवर आहे. या शोला सर्वाधिक 3.6 टीआरपी रेटिंग मिळाली आहे.
दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या 'गम है किसी के प्यार में'ला २.८ टीआरपी रँकिंग मिळाली आहे.सई आणि विराटमधील ट्रॅक चाहत्यांना खूप आवडला.
'इमली' हा शो गेल्या आठवड्यात टीआरपीच्या यादीत चौथ्या क्रमांकावर होता. मात्र, यावेळी ते २.८ च्या टीआरपी रँकिंगसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
ये रिश्ता क्या कहलाता है आणि ये है चाहतीं, हे दोन्ही शो 2.5 टीआरपी रँकिंगसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
सृती झा आणि शबीर अहलुवालिया स्टारर 'कुमकुम भाग्य' बद्दल बोलायचे तर हा शो 2.3 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.