CID Star Cast Now: दया ते एसीपी प्रद्यु्म्न, ५ वर्षांनंतर कुठे आहे ही सीआयडीची स्टारकास्ट; असं जगतायत जीवन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 04:31 PM2023-05-05T16:31:25+5:302023-05-05T16:43:22+5:30

सीआयडी हा टेलिव्हिजनवरचा प्रसिद्ध शो होता. या मालिकेनं तब्बल २० वर्ष लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.

'सीआयडी' हा लोकप्रिय शो होता. हा शो आणि यातील पात्र सर्वांच्याच मनात घर करून गेले. सीआयडीमधील एसीपी प्रद्यम्न ते दया आणि अभिजीत असे सर्वच जण आजही लोकांच्या मनात आहेत. इतक्या वर्षांनंतर 'सीआयडी’चे कलाकार कसे दिसतात आणि ते आता काय करत आहेत हे पाहूया.

सीआयडीचा पहिला एपिसोड २१ जानेवारी १९९८ रोजी आला होता. तब्बल २० वर्ष या शो नं लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. हा शो बीपी सिंग यांनी डायरेक्ट केला होता.

शिवाजी साटम हे बॉलिवूड आणि मराठी चित्रपट क्षेत्रातील एक दिग्गज नाव आहे. त्यांनी अनेक चित्रपटांमधू उत्तमोत्तम भूमिका साकारल्यात. २०२१ मध्ये हसीन दिलरुबा आणि मराठी चित्रपट बांबूमध्येही त्यांनी भूमिका साकारली होती.

दयानंद शेट्टी विक्की कौशलच्या गोविंदा नाम या चित्रपटात पोलिसाच्या भूमिकेत दिसला होता. तसंच तो सावधान इंडिया शो होस्ट करतानाही दिसलाय.

इन्स्पॅक्टर अभिजीत म्हणजेच आदित्य श्रीवास्तव आजही अनेक चित्रपटांतमध्ये निरनिराळ्या भूमिकांत दिसतोय. नुकताच तो राजकुमार राव सोबतही चित्रपटात दिसला होता.

डॉ. साळुंखे म्हणजेच नरेंद्र गुप्ता यांची भूमिकाही प्रसिद्ध झाली होती. २०२२ मध्ये ते फॉरेन्सिक या चित्रपटात दिसले होते.

डॉ. तारीका म्हणजे श्रद्धा मुसळे हीनं २०१२ मध्ये विवाह केला. त्यानंतर ती काही ठराविक प्रोजेक्ट्समध्येच दिसली.

फ्रेडी उर्फ दिनेश फडणीस हे २०१४ मध्ये तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये गेस्ट म्हणून दिसले होते. तर २०२१ मध्ये सीआयएफमध्ये दिसले होते.

इन्स्पेक्टर सचिन म्हणजेच ऋषिकेश पांडेनं अजय देवगनच्या रनवे ३४ मध्ये भूमिका साकारली होती. सध्या तो एकता कपूरच्या बेकाबू या मालिकेत दिसतोय.

पंकज उर्फ अजय नागरथ यानं बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली होती. त्यानंतर तो सीआयडीमध्ये इन्स्पेक्टर पंकजच्या भूमिकेत दिसला होता. सध्या तो बडे अच्छे लगते है २ मध्ये भूमिका साकारतोय.