'बिग बॉस मराठी'तील 'या' सदस्याचे वडील होते मुंबईचे डेप्युटी पोलिस कमिशनर, तर बहीण आहे मॉडेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 17:02 IST2026-01-31T16:49:36+5:302026-01-31T17:02:55+5:30
कोण आहे ही सदस्य? बहिण एकेकाळची आघाडीची मॉडेल, वडिलांना म्हणते 'रिअल हिरो'

'बिग बॉस मराठी सीझन ६'मध्ये यावेळी वेगवेगळे सेलिब्रिटी दिसत आहेत. रील स्टार्स, कलाकार, कॉमेडी स्टार अशा लोकांची मांदियाळी आहे.

गेल्या वेळी निक्की तांबोळीने सीझन गाजवलं होतं. तर यावेळी तिच्यासारखीच एक मॉडेल म्हणून सोनाली राऊतने घरात प्रवेश केला आहे.

सोनाली राऊत सध्या बिग बॉसच्या घरात काहीच काम करताना दिसत नाही. यामुळे रितेशने तिला मागच्या आठवड्यात चांगलंच सुनावलं होतं.

सोनाली राऊत ही अभिनेत्री आहे हे सगळ्यांना माहितच आहे. पण तिचे वडील हे मुंबईचे डेप्युटी पोलिस कमिशनर होते हे माहितीये का?

सोनालीने अनेकदा तिच्या पोस्टमधून वडिलांचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ते वर्दीत दिसत आहेत. ती वडिलांसाठी पोस्ट करताना नेहमी 'माय हिरो' असं संबोधते.

तसंच तिने आईसोबतचेही फोटो शेअर केले आहेत. सोनालीचं कुटुंबावर खूप प्रेम आहे. बिग बॉस ८ मध्ये सहभागी होताना तिच्या आईवडिलांनी सुरुवातीला तिला विरोध केला होता. मात्र नंतर त्यांनी होकार दिला असं तिने नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं होतं.

तर सोनालीला एक मोठी बहीण आहे जिचं नाव उज्वला राऊत आहे. उज्वला एकेकाळची प्रसिद्ध मॉडेल राहिली आहे. तिचं आयुष्य खूप चर्चेत होतं. अनेक बॉलिवूड कलाकारांसोबत तिचे फोटो आहेत.

सोनाली राऊतने हिमेश रेशमियासोबत 'द एक्सपोज' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. नंतर तिने रितेश देशमुखसोबत 'ग्रेट ग्रँड मस्ती'मध्ये दिसली.'किंगफिशर कॅलेंडर गर्ल'ही राहिली आहे.

















