Somya Seth : "शरीरावर जखमा होत्या, स्वत:चा जीव घ्यावासा वाटत होता पण मी प्रेग्नेंट होती म्हणून..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 15:56 IST2025-01-16T15:49:03+5:302025-01-16T15:56:06+5:30

Somya Seth : अभिनेत्री सौम्या सेठने पहिल्या लग्नाबद्दल मौन सोडलं आहे.

अभिनेत्री सौम्या सेठने TOI ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या पहिल्या लग्नाबद्दल मौन सोडलं आहे.

२०१७ मध्ये अभिनेता अरुण कपूरसोबत सौम्याचं पहिलं लग्न झालं होतं.

"मला चांगलंच आठवतंय, जेव्हा मी आरशासमोर उभी होती तेव्हा मी स्वत:ला ओळखू शकत नव्हते."

"शरीरावर जखमा होत्या, मी खूप दिवसापासून जेवली नव्हती आणि मी तेव्हा प्रेग्नेंट होती."

"जेव्हा मी खूप दिवसांनी स्वत:ला आरशात पाहिलं तेव्हा मला माझाच जीव घ्यावासा वाटत होता."

"मी प्रेग्नेंट होती आणि जर मी मेली तर मी माझ्या बाळावर किती प्रेम करते हे माझ्या मुलाला कधी समजणारच नाही."

"आईशिवाय मुलाला आयुष्य काढायला लागेल. मी स्वत:ला मारू शकत होती. पण मुलाचं नुकसान करण्याचा कधी विचारही केला नाही."

"मुलगा आयडेननेच त्यामुळे माझा जीव वाचवला" असं अभिनेत्रीने म्हटलं आहे. २०२३ मध्ये सौम्याने दुसरं लग्न केलं.

सौम्या सेठला 'नव्या' य़ा सीरियलमधून खरी ओळख मिळाली. ती गोविंदाची भाची आणि कृष्णा अभिषेकची बहीण आहे.