Photos: मेहंदी रंगली गं... शिवानीच्या हातावर रंगली अंबरच्या नावाची मेहंदी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 21:08 IST2025-01-19T20:58:51+5:302025-01-19T21:08:32+5:30
'राजा राणीची गं जोडी' मालिकेतून घराघरात पोहोचलेली संजीवनी म्हणजे अभिनेत्री शिवानी सोनार 'रंग माझा वेगळा' फेम अंबर गणपुळेशी लग्नबंधनात अडकणार आहे.

नवीन वर्ष सुरु झालंय आणि अनेकांच्या घरी लग्नाची लगबग सुरु आहे. अभिनेत्री शिवानी सोनार (Shivani Sonar) आणि अभिनेता अंबर गणपुळे (Ambar Ganpule) लवकरच बोहल्यावर चढणार आहेत.
शिवानी सोनारच्या घरी लग्नापूर्वींच्या विधींना सुरुवात झाली. शिवानीच्या मेहंदीचे फोटो समोर आले आहेत.
शिवानीने मेहंदीसाठी लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तर तिचा होणारा नवरा अंबरने तिला मॅचिग कुर्ता घातला.
अंबरसोबत तिनं मस्त कपल फोटोशूट केलं आहे. यात दोघेही खुपचं गोड दिसत आहेत.
या सोहळ्यात शिवानी प्रचंड खूश दिसली.
गेल्या वर्षी गुढीपाढव्याच्या शुभमुहूर्तावर ९ एप्रिल २०२४ या दिवशी शिवानी सोनार आणि अंबर गणपुळेचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर त्यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा होऊ लागली.
अगदी काही महिन्यांपूर्वीच दोघांनीही मोठ्या दणक्यात त्यांची बॅचलर पार्टी साजरी केली. आता लवकर शिवानी-अंबर लग्नबेडीत अडकणार आहेत.
शिवानीला या नव्या प्रवासासाठी तिला तिच्या कलाकार मित्रांनीही शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळतंय.
शिवानी सोनारचा होणारा नवरा अंबर गणपुळे हा एक लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने 'रंग माझा वेगळा', 'दुर्वा' या मालिकांमध्ये काम केलेलं आहे.
शिवानी सोनारबद्दल बोलायचं झालं, तर 'राजा राणीची गं जोडी' आणि 'तू भेटशी नव्याने' या मालिकांमुळे घराघरांत लोकप्रिय झाली.