'सावळ्याची जणू सावली' फेम अभिनेत्रीचा ऑफ-स्क्रीन लूक व्हायरल; ग्लॅमरस फोटोंनी वेधले लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 16:08 IST2025-11-08T15:56:14+5:302025-11-08T16:08:06+5:30

'सावळ्याची जणू सावली' मालिकेत अगदी साध्या आणि सोज्वळ रूपात दिसणारी ही 'सावली' खऱ्या आयुष्यात मात्र प्रचंड ग्लॅमरस आणि स्टायलिश आहे.

झी मराठीवरील 'सावळ्याची जणू सावली' मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेतील प्रमुख पात्र 'सावली' ही प्रेक्षकांना खूप आवडत आहे.

'सावळ्याची जणू सावली' मालिकेत अगदी साध्या आणि सोज्वळ रूपात दिसणारी ही 'सावली' खऱ्या आयुष्यात मात्र प्रचंड ग्लॅमरस आणि स्टायलिश आहे!

'सावली' ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचं नाव प्राप्ती रेडकर असं आहे.

प्राप्ती रेडकर ही गेल्या अनेक वर्षांपासून मराठी कलाविश्वात सक्रिय आहे.

यापूर्वी तिने कलर्स वाहिनीवरील 'काव्यांजली' आणि 'किती सांगायचंय मला' यांसारख्या मालिकांमध्येही काम केले आहे.

मालिकेतील तिच्या प्रतिमेच्या अगदी विपरीत, प्राप्ती रेडकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर तिचे ६ लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत!

ती नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यातील आणि करिअरमधील अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते.

तिचा 'ग्लॅमरस' अवतार: विशेष म्हणजे, प्राप्ती अनेकदा तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करते. तिच्या या ऑफ-स्क्रीन अवताराने चाहत्यांना अक्षरशः वेड लावले आहे.

मालिकेतील साधेपणामुळे तिला ओळखणेही कठीण झाले आहे, इतकी ती खऱ्या आयुष्यात वेगळी आणि आकर्षक दिसते.

'सावळ्याची जणू सावली' मालिकेमुळे प्राप्तीच्या अभिनयाची प्रशंसा होत असतानाच, तिच्या या ग्लॅमरस फोटोंमुळे सोशल मीडियावर तिची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.