'सारेगमप लिटिल चॅम्प्स' फेम प्रथमेश-मुग्धाच्या लग्नाला १ वर्ष पूर्ण, शेअर केली खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 13:48 IST2024-12-21T13:44:59+5:302024-12-21T13:48:49+5:30

Prathamesh Laghate-Mugdha Vaishampayan : मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांनी मागील वर्षी याच दिवशी म्हणजे २१ डिसेंबर रोजी लग्नाच्या बेडीत अडकून नवीन आयुष्याला सुरुवात केली.

मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांनी मागील वर्षी याच दिवशी म्हणजे २१ डिसेंबर रोजी लग्नाच्या बेडीत अडकून नवीन आयुष्याला सुरुवात केली.

मित्रपरिवार, नातेवाईक आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात चिपळूणमध्ये मुग्धा-प्रथमेशचा विवाहसोहळा पार पडला होता.

आज त्यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त प्रथमेश लघाटेने लग्न सोहळ्यातील काही फोटो शेअर केले आहेत.

प्रथमेशने फोटो शेअर करत लिहिले की, चि. व चि. सौ. कां ते श्री व सौच्या प्रवासाला १ वर्ष पूर्ण झाले. या कॅप्शनसोबत त्याने हार्ट इमोजी शेअर केली आहे.

प्रशमेशच्या या पोस्टवर चाहते लाइक्स आणि शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

मुग्धा आणि प्रथमेश दोघंही कोकणातलेच. मुग्धा अलिबागची तर प्रथमेश रत्नागिरीचा. कोकणचं सौंदर्य ते कायम त्यांच्या व्हिडीओमधून दाखवत असतात.

दोघेही उत्तम गायक तर आहेतच पण कुठलाही बडेजाव न दाखवता आपलं साधं, सुंदर आयुष्य चाहत्यांसोबत शेअर करत असतात.

दरम्यान, मुग्धा आणि प्रथमेश ही जोडी ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मधून लोकप्रिय झाली.

प्रथमेश आणि मुग्धाची भेट अगदी लहान वयातच सारेगमप शोमध्ये झाली. दोघांच्याही गाण्याचा जॉनर एक असल्याने नंतर त्यांनी एकत्र शास्त्रीय गायनाचे कार्यक्रम केले. तेव्हाच दोघांचे सूर जुळले.

लग्नानंतरही ते दोघे गाण्याचे एकत्र कार्यक्रम करताना दिसतात.