शेवंताचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; अपूर्वाचा बदललेला लूक पाहून चाहते थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 14:47 IST2024-04-24T14:43:08+5:302024-04-24T14:47:12+5:30

Apurva nemlekar: अपूर्वाने तिचं वजन कमालीचं घटवलं आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर. रात्रीस खेळ चाले या मालिकेमुळे अपूर्वा पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली.

सध्या अपूर्वा प्रेमाची गोष्ट या मालिकेत ग्रे शेड भूमिका साकारत आहे. यापूर्वी ती बिग बॉस मराठीमध्ये झळकली होती.

दमदार अभिनय आणि सौंदर्य यांच्या जोरावर अपूर्वा अल्पावधीत लोकप्रिय झाली.

सध्या अपूर्वा तिच्या मालिकेमुळे वा सौंदर्यामुळे नाही तर तिच्या फिटनेसमुळे चर्चेत येत आहे.

अपूर्वाने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. यात तिचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन झाल्याचं दिसून येत आहे.

अपूर्वाने तिचे जीममधील फोटो शेअर केले असून यात ती कमालीची फीट दिसत आहे.

अपूर्वाचे फोटो पाहून अनेकांनी तिला वजन कमी केलंस का?, बारीक दिसतीये वगैरे अशा कितीतरी कमेंट केल्या आहेत.

सध्या अपूर्वा प्रेमाची गोष्ट या मालिकेत सावनी ही भूमिका साकारत आहे. या मालिकेत ती बरीच ग्लॅमरस दाखवण्यात आली आहे. त्यामुळे कदाचित मालिकेसाठी अपूर्वाने वजन घटवल्याचं म्हटलं जात आहे.