'रंग माझा वेगळा'मधील श्वेता खऱ्या आयुष्यात आहे खूपच Bold & Glamorous; पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 20:11 IST2022-01-06T20:00:07+5:302022-01-06T20:11:29+5:30

'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) मालिकेत श्वेताच्या भूमिकेतून अभिनेत्री अनघा भगरे (Anagha Bhagare) घराघरात पोहचली आहे.

'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) मालिकेत श्वेताच्या भूमिकेतून अभिनेत्री अनघा भगरे (Anagha Bhagare) घराघरात पोहचली आहे.

या मालिकेत निगेटिव्ह भूमिका साकारणारी श्वेता म्हणजेच अभिनेत्री अनघा भगरे हिची ही पहिलीच मालिका आहे आणि तिने या मालिकेतून आपली छाप प्रेक्षकांच्या मनात उमटवली आहे.

अनघा अतुल भगरे ही भगरे गुरुजींची कन्या आहे. अनघाची आई मोहिनी भगरे या शिक्षिका आहेत

अनघा खऱ्या आयुष्यात खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस आहे.

अनघा सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

'रंग माझा वेगळा' ही तिची पहिलीच टीव्ही मालिका असून अनघाने 'अनन्या' या गाजलेल्या नाटकातही काम केले आहे.

'कुलकर्णी व्हर्सेस कुलकर्णी' आणि 'व्हॉट्सअॅप लग्न' या चित्रपटासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून तिने काम सांभाळले होते. याशिवाय काही काळ 'कोठारे व्हिजन'मध्ये पीआर ब्रँड मॅनेजर पदाचा भारही तिने सांभाळला होता.