ड्रामा क्वीन राखी सावंतचं खरं नाव माहिती आहे का?, इंडस्ट्रीत येण्यापूर्वी बदललं नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 10:23 AM2023-11-25T10:23:59+5:302023-11-25T11:36:57+5:30

आर्थिक अडचणींमुळे राखीने वयाच्या 10व्या वर्षापासून काम करायला सुरुवात केली.

ड्रामा क्वीन म्हटलं की, एकच नाव डोळ्यापुढं येतं, ते म्हणजे राखी सावंत हिचं. तिचे कारनामे काय सांगावे? आज राखी तिचा 45 वा वाढदिवस साजरा करतेय.

राखीचं आयुष्य खूप संघर्षाचं राहिलं आहे. राखी सावंतचा जन्म 25 नोव्हेंबर 1978 रोजी झाला असून तिचं खरं नाव नीरू भेडा आहे.

अग्निचक्र या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात राखीनं केली. यानंतर तिनं 'जोरू का गुलाम', 'जिस देश में गंगा रहता है'मध्ये काम केलं. त्यानंतर राखीने 'नच बलिये'मध्ये परफॉर्म केले.

2003 मध्ये, जेव्हा राखीने 'मोहब्बत है मिर्ची' मधून तिचा डान्स दाखवला तेव्हा तिला लोकांनी पसंती दिली.2005 मध्ये ती 'परदेसिया' या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली आणि हे गाणंही हिट झालं.

रिपोर्टनुसार, राखीकडे एकूण 37 कोटींची संपत्ती आहे. मुंबईत तिचे दोन अलिशान फ्लॅट्स आहेत. ज्यांची किंमत कोट्यवधीच्या घरात आहेत.

काही मीडिया रिपोर्टनुसार, तिच्याकडे 11 कोटी रूपयांचा एक बंगलाही आहे. फोर्ड की एंडेव्हर आणि फोक्स वॅगनची पोलो कार आहे.

आर्थिक अडचणींमुळे राखीने वयाच्या 10व्या वर्षापासून काम करायला सुरुवात केली. राखीनं 50 रुपयांसाठी टीना अंबानींच्या लग्नात लोकांना जेवण वाढलं होतं. आज तीच राखी आलिशान घरात राहते.

सध्या राखीचा उत्पन्नाचं साधन काय?देशविदेशात ती डान्स शो करते. अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्येही सहभागी होते.

राखीला जोरू का गुलाम, जिस देश में गंगा रहा है, ये रास्ते में अशा काही चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारण्याची संधी मिळाली. परंतु, तिला 2005 साली आलेल्या परदेसिया या गाण्याने खरी ओळख मिळाली. या गाण्यानंतर राखी सावंत आयटम गर्ल म्हणून प्रसिद्ध झाली.