'राधा ही बावरी' फेम सौरभ गोखलेची पत्नीही आहे प्रसिद्ध अभिनेत्री, 'बाजीराव मस्तानी'मध्ये केलंय काम

By देवेंद्र जाधव | Updated: June 25, 2025 15:58 IST2025-06-25T15:44:15+5:302025-06-25T15:58:45+5:30

मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा सौरभ गोखलेची पत्नीही प्रसिद्ध अभिनेत्री आहे हे फार कमी जणांना माहित असेल. तिने रणवीर सिंग, प्रियंका चोप्रासोबत काम केलंय.

'राधा ही बावरी' ही मालिका आठवतेय. या मालिकेत सौरभ आणि राधा या दोघांची जोडी चांगलीच गाजली होती. सौरभची भूमिका मालिकेत अभिनेता सौरभ गोखलेने साकारली होती

'राधा ही बावरी' मालिकेत सौरभ गोखले आणि श्रृती मराठेची जोडी चांगलीच गाजली. सौरभने नंतर अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं.

सौरभचं खऱ्या आयुष्यात लग्न झालं असून त्याची पत्नीही लोकप्रिय अभिनेत्री आहे हे फार कमी जणांना ठाऊक असेल. सौरभच्या पत्नीने बॉलिवूड गाजवलंय.

सौरभच्या पत्नीचं नाव आहे अनुजा साठे. अनुजाला आपण लगोरी या मराठी मालिकेत अभिनय करताना पाहिलंय. अनुजाने नंतर बॉलिवूडची वाट धरली

अनुजा साठेने बाजीराव मस्तानी या सिनेमात रणवीर सिंग, प्रियंका चोप्रा, दीपिका पादुकोणसोबत काम केलंय. याशिवाय अनुजाने ब्लॅकमेल सिनेमात दिवंगत अभिनेता इरफानसोबत काम केलं.

सौरभ आणि अनुजा यांनी एकमेकांच्या करिअरला कायमच सपोर्ट केला आहे. दोघेही एकमेकांच्या कामाचं चांगलंच कौतुक करत असतात.

सौरभ सध्या रंगभूमीवर सक्रीय आहे. याशिवाय कलावंत ढोल पथकाच्या माध्यमातून सौरभ गणेशोत्सवाला मराठी कलाकारांसोबत वादन करताना दिसतो. अशाप्रकारे सौरभ आणि अनुजाची जोडी मेड फॉर इच अदर आहेत.