बनारसी साडीत समृद्धी केळकरच्या दिलखेचक अदा; फोटोंवरून नजर हटेना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 16:58 IST2024-07-23T16:50:44+5:302024-07-23T16:58:29+5:30
'फुलाला सुगंध मातीचा' फेम अभिनेत्री समृद्धी केळकर या नावाला कोणत्याही परिचयाची गरज नाही.

या मालिकेत किर्ती नावाचं पात्र साकारून समृद्धी घराघरात पोहचली.
समृद्धी केळकर अभिनयाबरोबरच एक उत्तम नृत्यांगणा देखील आहे.
अलिकडेच ती 'मी होणार सुपरस्टार जोडी नं-१' या कार्यक्रमामुळे चर्चेत होती.
सोशल मीडियावर समृद्धीची तगडी फॅन फॉलोइंगही पाहायला मिळते.
समृद्धी सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
नुकतेच तिने बनारसी साडी नेसून काही खास फोटो तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केल्याचे पाहायला मिळत आहेत.
या व्हायरल फोटोंमध्ये अभिनेत्री फारच सुंदर दिसते आहे.