'नवा गडी नवं राज्य’ मालिकेतील रमाच्या खऱ्या आयुष्यातील नवऱ्याला पाहिलंत का?, या' क्षेत्रात आहे कार्यरत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 12:47 PM2022-10-29T12:47:46+5:302022-10-29T14:14:04+5:30

''नवा गडी नवं राज्य' या मालिकेत अनिता राघवच्या पहिल्या बायकोची म्हणजेच रमा ही मध्यवर्ती भूमिका साकारते आहे. विशेष म्हणजे तिच्या भूमिकेवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतायेत.

'नवा गडी नवं राज्य'(Nava Gadi Nava Rajya) या मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. या मालिकेत अभिनेत्री अनिता दाते-केळकर रमाची भूमिका साकारते आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

रमाचा मृत्यू झाला आहे. पण तरिही तिचं ‘भूत’ घरात नांदत असतं. तिचा नवरा राघव दुसरं लग्न करून आनंदीला घरात आणतो अशी या मालिकेची कथा आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

या मालिकेमुळे सध्या अनिताच्या प्रोफेशनल प्रोफेशनल लाइफसोबतच तिची पर्सनल लाइफही चर्चेत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

अनिताच्या नवऱ्याविषयी जाणून घेण्याची प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता आहे. त्यामुळे अनिताचा नवरा काय करतो, कसा दिसतो हे पाहुयात.(फोटो इन्स्टाग्राम)

अनिताच्या नवऱ्याचं नाव चिन्मय केळकर आहे. अनिता आणि चिन्मयचं लव्हमॅरेज आहे.(फोटो इन्स्टाग्राम)

ललित कला केंद्रात या दोघांची भेट झाली आणि या भेटीचं प्रेमात रुपांतर झालं.सिगारेट्स’ या नाटकाच्या तालमीवेळी तर हे प्रेम आणखीचं बहरलं. पण त्यावेळी दोघांनाही लग्न करायचं नव्हतं. अशात दोघांनी लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. (फोटो इन्स्टाग्राम)

दीड वर्ष लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर अखेर दोघांनी लग्न केलं. आता दोघंही सुखात संसार करत आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

चिन्मयने अनेक नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे तोही कलाविश्वाशी निगडीत आहे.सुप्रसिद्ध लेखक अशी ओळख असलेला चिन्मय दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबत काम करतो. (फोटो इन्स्टाग्राम)

चिन्मयला फोटोग्राफीची विशेष आवड आहे. चिन्मय सोशल मीडियावर फारसा सक्रीय नाही.(फोटो इन्स्टाग्राम)