"मी मालिकेच्या सेटवर त्याला सरप्राइज द्यायला गेलेले तेव्हा तो...", मयुरी वाघसोबत विश्वासघात, सांगितला कठीण काळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 12:41 IST2025-10-11T12:28:19+5:302025-10-11T12:41:58+5:30
लग्नानंतर दोन वर्षांतच मयुरी आणि पियुष वेगळे झाले. त्यांचा घटस्फोट हा चाहत्यांसाठीही मोठा धक्का होता. आता इतक्या वर्षांनी मयुरीने प्रथमच तिच्या घटस्फोटाबद्दल मुलाखतीत भाष्य केलं आहे.

मयुरी वाघ हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा. 'अस्मिता' मालिकेतून ती घराघरात पोहोचली. याच मालिकेच्या सेटवरच मयुरी आणि पियुष रानडे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
पण, लग्नानंतर दोन वर्षांतच मयुरी आणि पियुष वेगळे झाले. त्यांचा घटस्फोट हा चाहत्यांसाठीही मोठा धक्का होता. आता इतक्या वर्षांनी मयुरीने प्रथमच तिच्या घटस्फोटाबद्दल मुलाखतीत भाष्य केलं आहे.
मित्र म्हणे या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत मयुरीने पियुषसोबत घटस्फोट घेण्याचं कारणही सांगितलं. याशिवाय मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचा धक्कादायक खुलासाही मयुरीने केला.
ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवला त्याच्याकडूनच विश्वासघात झाल्याची भावना मयुरीने व्यक्त करत एक प्रसंगही सांगितला.
मयुरी म्हणाली, "आपल्याकडे मुलींना शिकवलं जातं की सहन करावं लागतं. लग्नानंतर काही गोष्टी बदलतात. पण, कधीपर्यंत हे सहन करायचं हे देखील आपण शिकवलं पाहिजे".
"मी त्याच्या सेटवर सरप्राइज द्यायला जायचे आणि तो तिथे नसायचा. कुठे जायचा माहीत नाही, फोन उचलायचा नाही आणि खूप रँडम स्टोरी मग ऐकायला मिळायची. गाडी पंक्चर झाली वगैरे, ज्यावर तुम्ही विश्वासही ठेवणार नाही".
घटस्फोटाच्या निर्णयाबद्दल मयुरी म्हणाली, "माझे आईबाबा माझ्यासाठी सर्वस्व आहेत. त्यांच्याबद्दल काहीही बोललेलं मी खपवून घेत नाही. मग समोर कोणीही असो".
"माझ्यापर्यंत बोलत होता तोपर्यंत गोष्टी ठीक होत्या. पण, त्याने एकदा माझ्या वडिलांबद्दल काही गोष्टी बोलल्या. माझे आईवडील आधीपासूनच मला यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. पण मी एक एक चान्स देत राहिले".
"जेव्हा माझ्या वडिलांबद्दल बोललं गेलं. तेव्हा मग मी ठरवलं की आता बास...आता मी नाही सहन करू शकत. या व्यक्तीला आणखी चान्स नाही देऊ शकत. आता विषय संपवला पाहिजे".