'राजा फोटो माझा काढ...', अमृतालाही मोह आवरेना; गुलाबी साडी नेसून केलं खास फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 03:16 PM2024-04-12T15:16:16+5:302024-04-12T15:25:07+5:30

अभिनेत्री अमृता धोंंगडे ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

'बिग बॉस मराठी ४' च्या घरामध्ये चर्चेत राहिलेलं नाव म्हणजे अमृता धोंगडे. हा सिझन तिने चांगलाच गाजवला.

'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेतून अभिनेत्रीने कलाविश्वात पाऊल ठेवलं. या मालिकेत काम करून अभिनेत्री अमृता धोंगडे प्रकाशझोतात आली.

या मालिकेत तिने साकारलेल्या सुमी या पात्राला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं.

अमृता सोशल मीडियावरही सक्रिय असल्याची पाहायला मिळते. त्या माध्यमातून ती सतत आपले फोटो, व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते.

अभिनेत्री अमृता धोंगडेने ट्रेडिंग गाण्यासाठी गुलाबी रंगाच्या साडी परिधान करून काही खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

केसात गुलाब ,नाकात नथ तसेच हातात मोत्यांच्या बांगड्या असा तिचा लूक पाहून चाहत्यांनी तिच्या फोटोंवर प्रतिक्रियेचा वर्षाव केलाय.

या व्हायरल फोटोंमध्ये ती अतिशय सुंदर दिसतेय. अभिनेत्रीचं हे घायाळ करणारं रूप नेटकऱ्यांना प्रचंड आवडलंय.