मराठी की अमराठी, दुसऱ्या लग्नासाठी कसा मुलगा हवा?, तेजश्री प्रधान जोडीदाराबद्दल स्पष्टच बोलली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 16:31 IST2025-08-18T16:28:50+5:302025-08-18T16:31:56+5:30
Tejashree Pradhan : 'वीण दोघातली ही तुटेना' ही मालिका सुरू झाल्यापासून तिची एक जुनी मुलाखत पुन्हा व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात तिने लग्नाबद्दल अनेक प्रश्नांची मनमोकळी उत्तरं दिली आहेत.

तेजश्री प्रधान मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात काम केले आहे.
तेजश्री प्रधान प्रेमाची गोष्ट मालिकेनंतर आता वीण दोघांची तुटेना या मालिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेत तिच्यासोबत अभिनेता सुबोध भावे मुख्य भूमिकेत आहे.
'वीण दोघातली ही तुटेना' ही मालिका सुरू झाल्यापासून तिची एक जुनी मुलाखत पुन्हा व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात तिने लग्नाबद्दल अनेक प्रश्नांची मनमोकळी उत्तरं दिली आहेत.
अभिनेत्री तेजश्री प्रधानचे पहिले लग्न अभिनेता शशांक केतकरसोबत झाले होते. पण त्यांचे हे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही.
तेजश्री प्रधानला एका मुलाखतीत दुसऱ्या लग्नासाठी तिला मराठी की अमराठी कसा जोडीदार हवा आहे, असे विचारण्यात आले. त्यावर तिने छान उत्तर दिले होते.
तेजश्रीने या प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं की, "मला मराठी मुलगा मिळाला तर आनंदच होईल, पण प्रेमाला भाषेचं कोणतंही बंधन नसतं. कोणीही असो पण माझ्यासाठी प्रेमाची व्याख्या खूप मोकळी आहे."
तिने या मुलाखतीत लग्नाबद्दलच्या तिच्या अपेक्षादेखील सांगितल्या. ती म्हणाली, "वयाच्या पंचविशीत जोडीदाराकडून खूप अपेक्षा असतात. तो असा हवा, तसा हवा पण आता आयुष्य पुढे गेल्यावर फक्त एकच गोष्ट महत्त्वाची वाटते, ती म्हणजे एक खरा, प्रामाणिक आणि शेवटपर्यंत साथ देणारा माणूस हवा."
तेजश्री प्रधानच्या या उत्तराने चाहत्यांचे मन जिंकले आहेत. सध्या अभिनेत्री मालिकेतून प्रेक्षकांचे मनं जिंकत आहे.