"जादू है, नशा है, मदहोशियाँ...", साडीत शिवालीच्या दिलखेचक अदा, फोटो पाहून चाहते फिदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 15:01 IST2024-09-02T14:52:14+5:302024-09-02T15:01:41+5:30
शिवालीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. शिवालीने नुकतंच साडीत फोटोशूट केलं आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो आहे. याच शोमधून अभिनेत्री शिवाली परब घराघरात पोहोचली.
या शोने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. शिवालीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
शिवालीने नुकतंच साडीत फोटोशूट केलं आहे. याचे काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेत.
या फोटोंमध्ये तिने गडद गुलाबी रंगाची साडी नेसून फोटोशूट केलं आहे. साडीवर स्लीव्हलेस ब्लाऊज घालत तिने ग्लॅमरस लूक केला आहे.
शिवालीने फोटोंसाठी खास पोझही दिल्या आहेत. तिच्या फोटोतील दिलखेचक अदा पाहून चाहतेही फिदा झाले आहेत.
निसर्गाच्या सानिध्यात हिरवळीत शिवालीने हे खास फोटोशूट केलं आहे. केस मोकळे सोडल्याने अभिनेत्रीच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे.
शिवालीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
शिवालीने मालिका आणि सिनेमामध्येही काम केलं आहे. 'प्रेम प्रथा धुमशान' या सिनेमात ती झळकली होती.