साध्या दिसणाऱ्या प्रियदर्शनीचा बोल्ड अंदाज, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीच्या हॉट फोटोंनी केला कहर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 03:39 PM2024-06-25T15:39:24+5:302024-06-25T16:02:40+5:30

प्रियदर्शनीने बोल्ड फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा छोट्या पडद्यावर लाडका शो आहे. या शोमधूनच अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर घराघरात पोहोचली.

उत्तम अभिनय आणि कमालीची विनोदबुद्धी असलेली प्रियदर्शनी प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करते. तिचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे.

प्रियदर्शनी सोशल मीडियावरही सक्रिय असते. अनेकदा नवीन प्रोजेक्टचे अपडेट चाहत्यांना देण्याबरोबरच ती तिचे फोटोही शेअर करताना दिसते.

नुकतंच प्रियदर्शनीने बोल्ड फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत.

फोटोंमध्ये तिने निळ्या रंगाचा हाय स्लिट ड्रेस परिधान करत ग्लॅमरस लूक केल्याचं पाहायला मिळत आहे.

फोटोतील प्रियदर्शनीचा बोल्ड अंदाज पाहून चाहते थक्क झाले आहेत. तिच्या हॉट फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

साध्या प्रियदर्शनीचे हे हॉट अंदाजातील फोटोशूट चांगलंच चर्चेत आहे. या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

प्रियदर्शनीने सिनेमांतही काम केलं आहे. सुबोध भावेच्या 'फुलराणी' सिनेमात ती झळकली होती.