मुंबईच्या बिझनेसमनशी थाटात केलं होतं लग्न; करिश्मा तन्नाच्या लग्नाच्या फोटोंवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 17:43 IST2026-02-05T17:31:23+5:302026-02-05T17:43:15+5:30

करिश्मा तन्नाचा नवरा आहे बिझनेसमन! 'पॉवरफुल' केमिस्ट्रीनं वेधलं चाहत्यांचं लक्ष

करिश्मा तन्ना हिंदीतल्या काही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

आज करिश्माच्या लग्नाला ४ वर्ष पुर्ण झाली आहेत. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त करिश्मानं सोशल मीडियावर त्यांचे खास फोटो शेअर केले आहेत.

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या पोस्टमध्ये करिश्माने वरुणचं आपलं प्रेम व्यक्त केलं. "Happy 4 Lover" अशा आशयाचे कॅप्शन तिने दिले आहे.

हे फोटो सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत असून चाहत्यांकडून या जोडीवर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

आज चार वर्षांनंतरही या जोडीमधील केमिस्ट्री चाहत्यांना भुरळ घालत आहे.

करिश्मा तन्नानं ५ फेब्रुवारी २०२२ रोजी मुंबईतील बिझनेसमन आणि तिचा बॉयफ्रेंड वरुण बंगेरासोबत लग्नगाठ बांधली होती.

करिश्मा गुजराती आहे. तर वरुण हा दक्षिण भारतीय आहे. त्यांच्या लग्नात या दोन्ही संस्कृतींचा सुंदर मिलाफ पाहायला मिळाला होता.

करिश्मा तन्नानं टेलिव्हिजन, चित्रपट आणि सीरिजमध्ये काम केलं आहे. याशिवाय करिश्मा अनेक रिअॅलिटी शोचा भाग बनली आहे.

तिने 'नच बलिये', 'बिग बॉस ८', 'झलक दिखला जा' आणि 'खतरों के खिलाडी १०' मध्ये भाग घेतला होता. 'खतरों के खिलाडी'मध्ये तिने ट्रॉफीचा मान पटकावला होता.