ठरलं तर मग! तेजस्वी प्रकाश करण कुंद्रासोबत या दिवशी घेणार सातफेरे, अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 12:55 IST2025-12-29T12:51:56+5:302025-12-29T12:55:47+5:30

Tejaswi Prakash and Karan Kundra : तेजस्वी प्रकाश तिच्या लव्ह लाइफमुळे बरीच प्रसिद्धी मिळवत असते. चाहते तिच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत, कारण ती गेल्या दीर्घकाळापासून करण कुंद्राला डेट करत आहे.

तेजस्वी प्रकाश ही टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मात्र, या इथंपर्यंत पोहोचण्यासाठी तिने प्रचंड मेहनत आणि संघर्ष केला आहे. ही अभिनेत्री आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत असते.

तेजस्वी प्रकाश तिच्या लव्ह लाइफमुळे बरीच प्रसिद्धी मिळवत असते. चाहते तिच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत, कारण ती गेल्या दीर्घकाळापासून करण कुंद्राला डेट करत आहे.

तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राच्या लग्नाच्या बातम्या अनेकदा चर्चेत असतात. मात्र, प्रत्येक वेळी दोघांनीही लग्नाच्या अफवांना फेटाळून लावले आहे.

पण, नुकताच तेजस्वी प्रकाशने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. खरं तर, अभिनेत्री भारती सिंग आणि हर्ष लिंबाचियाच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाली होती, जिथे तिने या विषयावर भाष्य केले.

या दरम्यान भारती आणि हर्षने तेजस्वीला विचारले की, ती लग्न कधी करणार? ती २०२६ मध्ये लग्न करणार का? यावर अभिनेत्रीने उत्तर दिले.

तेजस्वी प्रकाशने या गोष्टीला दुजोरा देत म्हटले की, "हो, असं तर बोललं जात आहे. आम्ही याबद्दल चर्चा करत आहोत, पण पाहूया पुढे काय होतंय."

अशा परिस्थितीत, तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा २०२६ मध्ये लग्न करू शकतात, हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे.

याबद्दल पुढे बोलताना तेजस्वी म्हणाली की, लग्न तर ठीक आहे पण मुलं होतील तो क्षण माझ्यासाठी सर्वात मोठा आनंदाचा असेल.

यादरम्यान तेजस्वीने हर्षलाही विचारले होते की, तुम्हाला किती मुलं हवी आहेत? त्यावर तो म्हणाला की ३-४ मुलं.