"ऑडिशनसाठी बोलवून बेशुद्ध केलं आणि...", अभिनेत्रीनं सांगितला कास्टिंग काउचचा धक्कादायक अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 16:15 IST2025-08-05T16:12:32+5:302025-08-05T16:15:46+5:30
Rashmi Desai : रश्मी देसाई तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते.

रश्मी देसाई तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. अभिनेत्री तिच्या आयुष्याशी संबंधित काहीतरी खुलासे करुन चर्चेत येत असते.
रश्मी देसाईने अलिकडेच एका मुलाखतीत सांगितले होते की, तिला वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी कास्टिंग काउचचा सामना करावा लागला होता. एक काळ असा होता जेव्हा तिला रस्त्यावर रात्र काढावी लागत होती.
रश्मी देसाई ही टीव्हीच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. पण, एक काळ असा होता जेव्हा ती भोजपुरी इंडस्ट्रीवर राज्य करत होती. या अभिनेत्रीने अनेक भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
रश्मीला इथंपर्यंत पोहोचण्यासाठी कठीण अडचणींचा सामना करावा लागला. बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत रश्मी म्हणाली की, १६ व्या वर्षी तिच्यासोबत एक वाईट प्रकार घडला.
रश्मी म्हणाली की, 'तिला ऑडिशनसाठी बोलावण्यात आले होते, जिथे तिला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तिचा जीव वाचवण्यासाठी ती कशीतरी तिथून पळून गेली.'
दुसऱ्या दिवशी रश्मीची आई तिला तिथे घेऊन गेली आणि त्या व्यक्तीला धडा शिकवण्यासाठी त्याला थापड मारली. अभिनेत्री म्हणाली की तिला तिच्या कारकिर्दीत चांगल्या लोकांचा पाठिंबा मिळाला.
रश्मी म्हणाली की, तिच्या आयुष्यात एक काळ असा होता जेव्हा तिला खूप वाईट काळातून जावे लागले. अभिनेत्री म्हणाली की जेव्हा तिचा शो बंद झाला तेव्हा ती खूप वाईट काळातून गेली.
रश्मी म्हणाली, 'मला चार दिवस रस्त्यावर झोपावे लागले.' त्यावेळी तिच्याकडे ऑडी ए६ होती, ती त्यात झोपायची.
रश्मीने सांगितले की तिने तिचे सामान तिच्या मॅनेजरच्या घरी ठेवले होते. अभिनेत्रीला अन्नाचीही कमतरता भासली. या काळात तिला घटस्फोटाचे दुःखही सहन करावे लागले.