माथेरानच्या निसर्गात मराठी अभिनेत्याचं हटके फोटोशूट! तुम्ही ओळखलं का या कलाकाराला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 17:00 IST2024-09-19T16:43:55+5:302024-09-19T17:00:15+5:30
मालिकाविश्वातील लोकप्रिय मराठी अभिनेत्याने माथेरानच्या निसर्गरम्य वातावरणात हटके फोटोशूट केलंय

सध्या अनेक मराठी कलाकार विविध ठिकाणी जाऊन फोटोशूट करताना दिसतात. अशाच एका मराठी कलाकाराने फोटोशूट करण्यासाठी थेट माथेरान गाठलंय
हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे आयुष संजीव. आयुषने माथेरानच्या निसर्गरम्य भागात केलेलं फोटोशूट चांगलंच व्हायर झालंय
आयुष संजीवने शर्टलेस पोज देत हटके फोटोशूट केलंय. आयुषने शूटींगमधून वेळात वेळ काढून माथेरानला गेला होता. तिथे त्याला हे खास फोटो काढायचा मोह आवरला नाही
आयुष संजीवने माथेरान येथील पेब किल्ल्यावर असलेल्या गणपती बाप्पाच्या मंदिरालाही चांगली भेट दिलीय. आयुषच्या या फोटोशूटला चाहत्यांनी पसंती दिलीय.
आयुष संजीव नुकतंच आपल्याला ३६ गुणी जोडी मालिकेत अभिनय करताना दिसलाय. आयुषची ही मालिका चांगलीच लोकप्रिय झाली
आयुष संजीव सध्या विविध म्यूझिक व्हिडीओमुळे चर्चेत आहे. आयुष विविध म्यूझिक व्हिडीओच्या माध्यमातून हटके डान्स आणि अभिनय करताना दिसतो
आयुष संजीवच्या नवीन मालिकेची सर्वांनाच उत्सुकता असून आयुषला पुन्हा एकदा मालिकाविश्वात पाहायला सर्वच उत्सुक आहेत.