'टीव्ही क्वीन' हिना खानच्या दिलखेचक अदा! चाहत्यांच्या नजरा हटता हटेना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 06:02 PM2024-02-08T18:02:12+5:302024-02-08T18:09:38+5:30

हिना खान ही एक लोकप्रिय अभिनेत्री असून तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

टीव्ही इंडस्ट्रीत आपल्या करिअरची सुरुवात करणारी हिना खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

हिना कायम नव्या लूकमध्ये हॉट आणि ग्लॅमरस फोटोशूट करत असते. आता देखील अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हिना खान हिच्या नव्या फोटोशूटची सर्वत्र चर्चा रंगली आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

हिना खाननं लाल शेडचा फ्लोरल प्रिंटेड शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. यात तिची हटके स्टाइल पाहायला मिळत आहे.

हिनाने सटल बेस, न्यूड रेड लिप्स आणि स्मोकी आय मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला आहे.

ॲक्सेसरीजसाठी हिनाने गोल्डन झुमके घातले आहेत. तसेच तिने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.

हिनाच्या प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर गेल्या वर्षी रिलीज झालेल्या 'बरसात आ गई' म्युझिक व्हिडिओमध्ये ती दिसली होती.

तर 'कंट्री ऑफ ब्लाइंड' या चित्रपटामुळे ती चर्चेत आहे. इंग्रजी कादंबरीकार एचजी वेल्स यांच्या कथेवर आधारित या चित्रपटात हिना खान महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याची कथा एका खास समुदायावर आधारित आहे जी बाहेरच्या जगापासून अलिप्त राहते.

हिना सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. अशा परिस्थितीत तिची फॅन फॉलोइंगही झपाट्याने वाढत आहे.

अभिनेत्री हिना खान हे टीव्ही इंडस्ट्रीमधील मोठं नाव आहे. 'नागिन', 'बिग बॉस', 'यह रिश्ता क्या कहलाता है' यासारख्या मालिकांमधून तिने छोट्या पडद्यावर दबदबा निर्माण केला आहे.