'करवा चौथ'ला पत्नी हिना खानच्या पाया पडला रॉकी, फोटो शेअर करत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 18:53 IST2025-10-12T18:45:50+5:302025-10-12T18:53:19+5:30

अन् तो बायकोच्या पाया पडला, रॉकीने हिना खानबरोबर खास पद्धतीने साजरा केला करवा चौथ

उत्तर भारतामध्ये 'करवा चौथ' हा सण प्रामुख्याने साजरा केला जातो. पतीची भरभराट व्हावी, त्याचे आयुष्य वाढावे यासाठी स्त्रिया करवा चौथच्या दिवशी उपवास ठेवतात आणि रात्री चंद्राचे दर्शन घेऊन पतीच्या हाताने गोड पदार्थ खाऊन उपवास सोडतात. गुरुवारी देशभरामध्ये हा सण मोठ्या थाटात साजरा केला गेला. अनेक सेलिब्रिटीही या उत्सवात सहभागी झाले.

हिना खान आणि रॉकी जयस्वाल ही टेलिव्हिजन विश्वातली लोकप्रिय जोडी आहे. गेल्या जून महिन्यात दोघांनी लग्न केलं. त्याआधी काही वर्ष ते एकमेकांना डेट करत होते.

यंदा हिना खानने रॉकीसह करवा चौथ हा सण साजरा केला. त्यांच्या करवा चौथचे फोटो रॉकीने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. हे फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत.

फोटोंना दिलेल्या कॅप्शनमध्ये रॉकीनं लिहलं, "शिव आणि शक्तीच्या मिलनाने जशी विश्वाची निर्मिती झाली, तसंच जेव्हा तिनं मला माझ्या सर्व अपूर्णतेसह स्वीकारलं आणि मला अधिक चांगलं घडवलं, त्याच क्षणी माझे जग, माझे जीवन दिव्य झाले".

पुढे त्यानं लिहलं, "ती देवी आहे जिने फक्त तिच्या उपस्थितीने आणि असीम प्रेमानं माझं अस्तित्व सजवलं. मी तिच्या चरणी कायम शांत आहे. तिची दैवी ऊर्जा माझ्या आत्म्यात चैतन्य निर्माण करते", या शब्दात त्यानं पत्नीवरील प्रेम व्यक्त केलं.

लग्नानंतर हिनाचं हे पहिलं करवा चौथ होतं. नवविवाहित वधूसारखी ती सजली होती. नेकलेसनं तर तिच्या सौंदर्यात आणखी भर घातली.

हिना खान आणि रॉकी हे सध्या "पती, पत्नी और पंगा" या रिॲलिटी शोमध्ये दिसत आहेत, ज्यामध्ये दोघांनाही चाहत्यांकडून खूप प्रेम मिळत आहे.

रॉकी जयस्वाल एक व्यावसायिक, निर्माता आहे, ज्यानं चित्रपट आणि टीव्ही जगात विविध क्षेत्रात काम केलं आहे. सुपरवायझिंग प्रोड्युसर म्हणून तो प्रसिद्ध आहे.

रॉकीचा स्वतःचा कपड्यांचा ब्रँड देखील चालवतो. याशिवाय त्याने स्वतःचं नवीन RockAByte एप देखील तयार केलं आहे. याच्या मदतीने तो नवीन टॅलेंटला संधी देतो.

गेल्या वर्षी हिनाला कर्करोगाचं निदान झाल्यानंतर, रॉकी तिचा आधारस्तंभ बनून तिच्यासोबत उभा राहिला. हिनानं अनेकदा रॉकीनं तिच्या कठीण काळात दिलेल्या सततच्या पाठिंब्याबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत.