टीव्हीच्या विश्वातील सर्वात महागडे जज, यांची एका एपिसोडची कमाई वाचून बसणार नाही विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 12:20 PM2022-05-24T12:20:41+5:302022-05-24T12:27:40+5:30

Highest paid Tv judges : बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी जजच्या खुर्चीवर बसलेले दिसतात आणि महत्वाची बाब म्हणजे यातून ते रग्गड कमाईही करतात.

Highest Paid TV Judges: गेल्या अनेक वर्षांपासून टीव्हीच्या विश्वा वेगवेगळ्या रिअॅलिटी शोजनी धमाका केला आहे. आधीच तर या शोजमध्ये एक्सपर्ट्सना जज म्हणून बसवलं जात होतं. पण आता काळानुसार, बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी जजच्या खुर्चीवर बसलेले दिसतात आणि महत्वाची बाब म्हणजे यातून ते रग्गड कमाईही करतात.

रेमो डिसूजा: बॉलिवूडचा प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसूजाने डान्सच्या विश्वास आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. काही रिपोर्ट्सनुसार, जेव्हा रेमो 'डान्स इंडिया डान्स' शो जज करत होता तेव्हा तो एका एसिपोडसाठी २.५ लाख रूपये मानधन घेत होता. आता ते वाढून ९ ते १० लाख रूपये झालं आहे.

हिमेश रेशमिया: गायक आणि संगीतकार हिमेश रेशमिया 'इंडियन आयडल' च्या जजपैकी एक आहे. हिमेश रेशमिया एका एपिसोडसाठी साधारण ४ लाख रूपये चार्ज करतो.

नेहा कक्कर: नेहा कक्कर तर आता सिंगिंग रिअॅलिटी शोजचा जीव बनली आहे. ती 'इंडियन आडयल' शो जज करताना दिसते. नेहा एका एसिसोडसाठी ५ लाख रूपये मानधन घेते.

नेहा धूपिया: बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाने सिनेमातून भलेही फार कमाई केली नसेल, पण 'रोडीज'मध्ये जज बनून तिने चांगली कमाई केली. नेहा धुपिया एका एपिसोडसाठी ८ लाख रूपये मानधन घेते.

रोहित शेट्टी: बॉलिवूडचा शानदार दिग्दर्शक रोहित शेट्टी 'खतरों के खिलाड़ी' शो गेल्या पाच वर्षांपासून होस्ट करत आहे. असं सांगितलं जातं की, रोहित या शो च्या एका एसिपोडसाठी ९ लाख रूपये चार्ज करतो.

मलाइका अरोड़ा: मलायका अरोरा तर सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे. ती वेगवेगळ्या शोजमध्ये जज म्हणून दिसते. सध्या ती 'इंडियाज गॉट टॅलेंट' मध्ये जज आहे. ती पूर्ण सीझन १ कोटी चार्ज करत आहे. तशी ती इतर शोच्या एका एपिसोडसाठी ८ ते ९ लाख रूपये घेते.

शिल्पा शेट्टी: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी अनेक शोजमध्ये जज म्हणून दिसते. रिपोर्ट्सनुसार, शिल्पा शेट्टीने 'सुपर डांसर' साठी १४ कोटी रूपये मानधन घेतलं आहे.

गीता कपूर - गीता कपूर डान्स रिअॅलिटी शोजची जान आहे हे सर्वांनाच माहीत आहे. ती शोमध्ये असली की, एक वेगळी रौनक येते. अशात ती लोकप्रिय जज आहे. गीता कपूर एका एपिसोडसाठी १२ ते १५ लाख रूपये मानधन घेते.